धुमडेवाडी येथे विधवा प्रथा बंद, ग्रामसभेत गावाने घेतला एकमुखी निर्णय - चंदगड लाईव्ह न्युज

30 May 2022

धुमडेवाडी येथे विधवा प्रथा बंद, ग्रामसभेत गावाने घेतला एकमुखी निर्णय


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       धुमडेवाडी  (ता. चंदगड) गावाने विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सरपंच आर. जी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत बहुमताने हा क्रांतीकारक निर्णय घेतला. याबाबतचा ठरावही संमत करण्यात आला.

         प्रारंभी सरपंच आर. जी. पाटील उपस्थितीतांचे स्वागत करून विधवा प्रथा बंद करणे का गरजेचे आहे, याची माहिती दिली. परंपरेनुसार पतीच्या निधनानंतर पत्नीच्या कपाळावरील कुंकू पुसणे, मंगळसूत्र तोडणे, बांगड्या फोडणे, जोडवी काढणे तसेच धार्मिक व अन्य कार्यक्रमात विधवा महिलांना सहभागी होऊ दिले जात नाही. यामुळे त्यांचे मानसिक खच्चीकरण होते. या अनिष्ट प्रथेतून त्यांना बाहेर काढण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले. या ठरावाला उपसरपंच देवकाबाई पुनीत परमहंस यांनी अनुमोदन दिले. तसेच यावेळी पावसाचे पाणी साठविणे, विविध योजनांची माहिती, पुरस्थिती, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन यावरही चर्चा करण्यात आली.

         ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाटील, विठ्ठल पाटील, रोहिणी पाटील, रेश्मा पाटील, पूजा पाटील तसेच पोलीस पाटील मोहन पाटील, माजी पोलीसपाटील सुभाष पाटील, सोसायटीचे उपाध्यक्ष जोतिबा पाटील, संचालक पुंडलिक पाटील, जानबा पाटील, संजय पाटील यांच्यासह शंकर पाटील, दशरथ पाटील, प्रकाश पाटील, जोतिबा पाटील, धोंडिबा पाटील, विजय पाटील, पांडुरंग पाटील, बाळू पाटील, गोविंद पाटील, पप्पू पाटील, विठ्ठल पाटील, अर्जुन पाटील, सतबा दोड्डानावर आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते. आभार ग्रामसेविका विद्या बोस यानी मानले. 



No comments:

Post a Comment