कालकुंद्री येथील नारायण पाटील यांच्या घराच्या समाजकंटकांनी फोडलेल्या खिडकीच्या काचा. |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
कालकुंद्री (ता. चंदगड) येथील एका घरावर काल दि. २९ रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी दगडफेक केली.
स्वातंत्र्यवीर सावरकर नगर मध्ये नारायण विठोबा पाटील (गोपाळगावडे) यांचे राहते घर आहे. रात्री जेवण करून झोपले असता मध्यरात्री दीडच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी रस्त्यावरून घरावर दगडफेक केली. यात घराच्या समोरील खिडकीच्या काचा फुटल्या. खिडकी लगत आतील बाजूस त्यांचा झोपण्याचा पलंग आहे. यावर खिडकीच्या फुटलेल्या काचा व दगड येऊन पडले. तथापि काल ते वरच्या मजल्यावरील खोलीत झोपल्यामुळे बचावले. आवाज येताच खाली येऊन पहिले तथापि अंधाराचा फायदा घेऊन समाजकंटक गायब झाले होते. घटनेची माहिती ग्रामपंचायतला दिल्यानंतर सरपंच संभाजी पाटील यांनी येऊन पाहणी केली. याबाबत पोलिसात तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या घटनेमुळे गावात घबराट पसरली असून समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांना अद्दल घडवावी अशी मागणी होत आहे.
No comments:
Post a Comment