चंदगडच्या अनिता देशमुख (भूतल) यांचे सुयश, राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्य भूषण पुरस्कार - चंदगड लाईव्ह न्युज

22 May 2022

चंदगडच्या अनिता देशमुख (भूतल) यांचे सुयश, राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्य भूषण पुरस्कार

मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्विकारताना अनिता देशमुख (भूतल)

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          नुकताच ठाणे येथील मराठी साहित्य मंडळाचा साहित्यविषयक कामगिरीचा राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्य भूषण हा प्रतिष्ठेचा पुरस्कार अनिता शंकर देशमुख (भूतल) (मुळ गाव - चंदगड) यांना प्राप्त झाला आहे. त्यांनी लिहिलेल्या लाज मोहोर या काव्यसंग्रहासाठी हा पुरस्कार देण्यात आला. 

         ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे, ज्येष्ठ कवी प्रा. अशोक बागवे, कवयित्री ललिता गवांदे आणि कवी सुरेश लोहार, डॉ. जय प्रकाश घुमटकर, लेखिका नीलिमा जोशी यांच्या उपस्थितीत पुरस्कार सोहळा संपन्न झाला. शाल, श्रीफळ. मानचिन्ह व सन्मानपत्र देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. मराठी ग्रांथ संग्रहालय, ठाणे येथे कार्यक्रम पार पडला. 

         अनिता देशमुख (भूतल) या मूळच्या चंदगडच्या असून सध्या त्या सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत. निवृत्त प्राचार्य एस. आर. देशमुख यांच्या त्या ज्येष्ठ कन्या होत. त्यांच्या या यशाबद्दल तालुक्यात त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment