तडशिनहाळच्या रामलिंग सेवा संस्थेच्या पदाधिकाी निवडीवेळी उपस्थित मान्यवर मंडळी. |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
तडशिनहाळ (ता. चंदगड) येथील श्री रामलिंग विकास सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी आप्पाजी रामू करडे व उपाध्यक्षपदी पुंडलिक कदम बिनविरोध निवड करण्यात आली. संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन खंडाळे यांनी काम पाहिले.
अध्यक्षपदासाठी आप्पाजी करडे यांचे नाव निंगाप्पा गुरव यांनी तर उपाध्यक्षपदासाठी पुंडलिक कदम यांचे नाव कृष्णा दरेकर यांनी सुचवले. त्याला अनुक्रमे रामलिंग गुरव व बाबाजी पाटील यांनी अनुमोदन दिले. यावेळी नूतन संचालक बाळू ओमाना दरेकर, सौ. जयवंता बाळू करडे, पिराजी मनगुतकर, लक्ष्मण शिंदे, सौ. सरिता बोलके, यल्लाप्पा कांबळे उपस्थित होते. यावेळी तंटामुक्त अध्यक्ष नारायण दळवी, नारायण पाटील, मोनाप्पा निवगिरे पोलीस पाटील भालचंद्र पाटील यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. सचिव नितीन अष्टेकर यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment