नरसिंह हायस्कूल चे माजी विद्यार्थी ३९ वर्षांनी शिक्षकांसह एकत्र - चंदगड लाईव्ह न्युज

24 May 2022

नरसिंह हायस्कूल चे माजी विद्यार्थी ३९ वर्षांनी शिक्षकांसह एकत्र

 

निट्टुर येथील नरसिंह हायस्कूल चे ३९ वर्षानंतर गेट-टुगेदर च्या माध्यमातून एकत्र आलेले विद्यार्थी, विद्यार्थिनी.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
निट्टूर (ता. चंदगड) येथील श्री नरसिंह हायस्कूल चे माजी विद्यार्थी आपल्या तत्कालीन शिक्षकांसह तब्बल ३९ वर्षांनी एकत्र आले. ही किमया व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातून साध्य झाली. 
  नरसिंह हायस्कूल मध्ये सन १९८२/८३ मध्ये एसएससी झालेल्या बॅचने आपल्या जुन्या शाळेत एकत्र येत गेट-टुगेदर साजरा केला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षक  जे जे नार्वेकर होते.
 सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थिनींना एकत्र आणण्याचे कार्य करणाऱ्या बळवंत लोंढे यांनी उपस्थित गुरुजन व विद्यार्थ्यांचे स्वागत केले. प्रास्ताविक करताना त्यांनी शाळेतील चाळीस वर्षांपूर्वीच्या घटनांना आपल्या भाषणातून उजाळा दिला. यावेळी जुन्या आठवणींनी सर्वांचे कंठ दाटून आले. सर्वांना एकत्र आणण्यात मोलाची कामगिरी करणारे लोंढे यांचा गुरुजनांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी तानाजी जाधव, शिक्षक एम वाय पाटील, अशोक पाटील, गणपत कदम, राजाराम पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी उपस्थित सर्व गुरुजनांचा शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. तर माजी विद्यार्थीनींना साडी, ब्लाऊज भेट देण्यात आली.
सर्व माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक यांनी उपस्थित राहून गतकाळातील आठवणींना उजाळा दिला यावेळी वातावरण भावपूर्ण बनले होते.


फोटो 
निट्टुर येथील नरसिंह हायस्कूल चे ३९ वर्षानंतर गेट-टुगेदर च्या माध्यमातून एकत्र आलेले विद्यार्थी, विद्यार्थिनी.

No comments:

Post a Comment