हलकर्णी येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात - चंदगड लाईव्ह न्युज

17 June 2022

हलकर्णी येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात

हलकर्णी : विद्यार्थी स्वागत कार्यक्रमात उपस्थित मान्यवर.

कागणी : सी. एल. वृत्तसेवा

           नवीन शैक्षणिक वर्ष सन 2022/23 सुरू झाले आहे. त्यानिमित केंद्रीय प्राथमिक शाळा हलकर्णी (ता. चंदगड) येथे अतिशय उत्साही व आनंदी वातावरणात प्रवेशोत्सव साजरा करणे त आला.

         यावेळी इ.१ लीच्या दाखलपात्र मुलांची सजविलेल्या ट्रालीमध्ये बसवून लेझीमच्या तालावर घोषणांच्या गजरात संपूर्ण गावभर मिरवणूकीने शाळेच्या प्रांगणात दाखल झाली. यावेळी उपस्थितीत पालक व मान्यवर यांच्या हस्ते फुले देऊन  सर्वांचे स्वागत करणेत आले. यावेळी सुरुवातीला  सा. फुले यांच्या फोटोचे पूजन नरसू कृष्णा नाईक यांच्या हस्ते करणेत आले .                           दिवप्रज्वलन  कृष्णा सुतार अनिल भातकांडे, लक्ष्मण नाईक यांनी केले. १ लो ते ७ वीच्या सर्व विद्यार्थांना पाठ्यपुस्तके,व लाभार्थीना गणवेश वाटप नरसू नाईक, केंद्र प्रमुख वाय.के. चौधरी, संदिप जाधव (सामाजिक कार्यकर्ते ) पांडूरंग केसरकर ( सामा. कार्यकर्ते ) यांच्या हस्ते सर्वांना पाठ्यपुस्तकांचे वाटप उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मिरवणूकीचे चे सारथी संदिप आवडण यांनी केले.

            कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अशोक बेनके यांनी केले. शुभेच्छा सुभाष चांदिलकर यांनी दिल्या. आभार मनोहर पाटील यांनी मानले. शाळा प्रवेशोत्सव साठी बुंदी लाडूचे वाटप शा. पो. ठेकदार सुवर्णा परशराम जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्जुन चाळूचे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जोतिबा बामणे, कमल तरवाळ यांनी व विशेष परिश्रम घेतले. यावेळी शरयू जोशी', आश्विनी पाटील, लक्ष्मी गावडे अंगणवाडी सेविका व गावातील बहुसंख्य पालक विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment