माणगाव : एम. टी. कांबळे यांचा सत्कार करताना मान्यवर |
कागणी : सी. एल. वृत्तसेवा
श्री माणकेश्वर सार्व. मोफत वाचनालय माणगाव (ता. चंदगड) यांच्या वतीने विविध मान्यवरांचा गौरव करण्यात आला. सेवानिवृती निमित एम्.टी. कांबळे (शिक्षण विस्तार अधिकारी) व वाचनालयाचे संचालक तथा संस्थेचे पदाधिकारी यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी एम. टी. कांबळे यांनी वाचनालयला ग्रंथ भेट दिले. व जीवनात ग्रंथाचे महत्व सांगून मी सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यासाठी आपल्यासोबत असलेचे सांगितले.
विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी निवड झालेबद्दल सुधीर मोतीराम लांडे यांचा सत्कार जगदीश वाघराळे (उपाध्यक्ष वाचनालय) यांच्या हस्ते झाला.
व्हा. चेअरमन सुनिल बापूसो पाटील यांचा सत्कार नामदेव बेनके (संचालक तालुका संघ) यांच्या हस्ते तर धनलक्ष्मी पंतसंस्था संचालक अनिल शिवपूत्र पाटील यांचा सत्कार जयवंत सुरूतकर (तंटामुक्त अध्यक्ष) यांचा हस्ते झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनिल आप्पासो सुरुतकर होते. अनिल शिवपूत्र पाटील सर यांनी सत्कार बद्दल ऋण व्यक्त केले. महादेव शिवनगेकर यांनी शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन सटूप्पा फडके यांनी केले. आभार मारूती चिंचणगी यांनी मानले. यावेळी वाचनालयचे सर्व संचालक व वाचक मंडळी बहुसंख्येने उपस्थितीत होते.
No comments:
Post a Comment