कालकुंद्रीचे अर्जुन मुतकेकर यांच्या 'मी भारतवासी 'पुस्तकाचे प्रकाशन थाटात - चंदगड लाईव्ह न्युज

17 June 2022

कालकुंद्रीचे अर्जुन मुतकेकर यांच्या 'मी भारतवासी 'पुस्तकाचे प्रकाशन थाटात

आजरा : पुस्तक प्रकाशन करताना मान्यवर

कागणी : सी. एल. वृत्तसेवा

         'ज्यांनी देशाचे गौरवगान केले त्यांचे कवित्व अमर झाले. 'असे म्हणता येईल. अशाच आशयाचे अर्जुन मुतकेकर (कालकुंद्री, ता. चंदगड) लिखित 'मी भारतवासी 'या पुस्तकाचे प्रकाशन संत साहित्याचे गाढे अभ्यासक व आजरा महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. शिवशंकर उपासे यांच्या हस्ते झाले.

        त्याप्रसंगी ते म्हणाले 'थोर कविंच्या नाळेशी जोडणा-या या कविता नक्कीच भारतवासीयांच्या एकतेसाठी प्रेरीत करतील. 'यावेळी प्रमुख पाहूणे समाज प्रबोधनाचे कार्य करणारे प्रा. डॉ. नवनाथ शिंदे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री. सुनिल सुतार, सुभाष विभुते, पुष्पा घोळसे, अरूण पाटील, अविनाश पाटील, दिलीप पाटील, संदीप पाटील, मोहन पाटील, नंदकुमार पाटील, विठ्ठल बागिलगेकर, अरूण केसरकर, नातेवाईक, शिक्षक, मित्रमंडळ व अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रस्तावना प्रा. चंद्रकांत निकाडे यांनी केली आहे. ते म्हणतात, 'वाचकांच्या मनातील अंगार फुलविण्याचे महान कार्य या कविता करतील.

          सदर पुस्तक अक्षर प्रकाशन आजरा यांनी प्रकाशित केले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन उत्तम कोकितकर यांनी केले. याप्रसंगी पुस्तकें भेट देऊन मुतकेकर कुटुंबियातील मंजुषा, सुशांत, साक्षी यांनी स्वागत केले.

No comments:

Post a Comment