चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
येथील प्रा. नामदेवराव दुंडगेकर चंदगड तालुका शिक्षण सेवकांच्या सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी शिवाजी निंगोजी खरुजकर यांची व उपाध्यक्षपदी संजय दंडाप्पा पाटील यांची तर कोवाड शाखा अध्यक्षपदी ए. टी. पाटील यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निबंधक अनूराधा काटकर यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या कार्यालयात निवडीचा कार्यक्रम झाला.
शैलेश सावंत, माजी अध्यक्ष शिवाजी हरेर, उपाध्यक्ष खेमान्ना बोकडे उपस्थित होते. सभासदांचा संस्थेवर असलेला विश्वास आणि पारदर्शक कामकाज याचा मेळ घालून संस्थेचे व्यवस्थापन करावे, असे सांगून माजी अध्यक्ष शिवाजी हरेर यांनी उपस्थित संचालकांचे स्वागत केले. यावेळी सचिव प्रदिप कुंभार यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. अध्यक्षपदासाठी शिवाजी खरुजकर यांचे नांव ए. वाय. जाधव यांनी सूचविले. नंदकुमार पाटील यांनी त्याला अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी संजय पाटील यांचे नांव एस. डी. पाटील यांनी सुचविले तर वंदना यादव यांनी अनुमोदन दिले. नूतन अध्यक्ष खरुजकर, उपाध्यक्ष पाटील व शाखा अध्यक्ष ए. टी. पाटील यांचा संस्थेच्यावतीने शैलेश सावंत, माजी अध्यक्ष शिवाजी हरेर, उपाध्यक्ष खेमान्ना बोकडे यांच्या हस्ते सत्कार झाला. सत्काराला उत्तर देताना अध्यक्ष खरुजकर यांनी ऋणज्ञता व्यक्त केली.
यावेळी नूतन संचालक अरुण योगेश्वर जाधव, एस. डी. पाटील, जोतीबा सट्टप्पा पाटील, नंदकुमार शंकर पाटील, विठ्ठल कल्लापा मोहिते, सुभाष जक्कोबा गावडे, सुभाष लक्ष्मण बेळगांवकर, सुनिल रामा सप्ताळे, वंदना सुनिल यादव, मालन पांडूरंग कांबळे यांच्यासह विलास गावडे, दत्तात्रय, खाडे, नितेश मोरे उपस्थित होते. शाखाधिकारी उज्वलराव देसाई यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment