विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभावेळी बोलताना प्रा. संजय साबळे. |
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
'मला काय करायला हवे हे ज्याला कळते तो जीवनात यशस्वी होतो. म्हणून स्वतःची क्षमता व आवड ओळखून क्षेत्र निवडा यश हमखास मिळते. ' असे प्रतिपादन दि न्यू इंग्लिश स्कूलचे अध्यापक संजय साबळे यांनी केले.
ते र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या विज्ञान विभागातील तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्याच्या निरोप समारंभात प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील होते. प्रास्ताविक प्रा. एम. एस. दिवटे यांनी केले.
संजय साबळे पुढे म्हणाले, ज्या माणसा कडे विचार असतो तीच माणसे सुंदर जीवन जगतात म्हणून पहिल्यांदा विचार करायला शिका कारण विचारच माणसाला जगायला आणि जिंकायला शिकवतात. मिळालेल्या साधनांचा व वेळेचा योग्य वापर केल्यास यश नक्की मिळते." असे मत प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांनी केले. यावेळी कु. मीनल मोटर, कु. सोनाली दळवी, संदिप नाईक, संदेश गडकरी यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला प्रा डॉ. एम. एम. माने, प्रा. डॉ. आर. के. तेलगोटे, प्रा. एम. एस. दिवटे, प्रा. हर्षाली सावंत भोसले, प्रा. आढाव, प्रा. संदेश पेडणेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आर. एन. साळुंखे यांनी तर आभार प्रा. संदेश गडकरी यांनी मानले.
No comments:
Post a Comment