दाव्याचा गळफास लागल्याने बैलांचा मृत्यू, नागरीकांतून हळहळ व्यक्त, चंदगड तालुक्यातील घटना........... - चंदगड लाईव्ह न्युज

30 June 2022

दाव्याचा गळफास लागल्याने बैलांचा मृत्यू, नागरीकांतून हळहळ व्यक्त, चंदगड तालुक्यातील घटना...........



तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

             अलबादेवी (ता. चंदगड) या गावातील मेहनती शेतकरी  सुरेश कृष्णा घोळसे यांच्यावर ऐन शेतीकामाच्या हंगामात मोठं संकट कोसळल. सुरेश  यांच्या गोठ्यामध्ये बांधलेली बैलजोड दावे एकमेकांमध्ये अडकल्याने फास लागून मरण पावली. 

          शेतकऱ्याचा आधार असणारे बैल मृत्यू मूखी पडलेला हा प्रसंग पाहताना पाहणाऱ्याच्या डोळ्यातून पाणी येत होत. तर ज्यांची बैल जोड या दुदैवी प्रसंगात गेली त्या सुरेश यांना या घटनेचा खुप मोठा आघात झाला आहे. शेतकऱ्याचे जिवाभावाचे सोबती त्याची बैलजोड असते आणि सुरेश  यांना आज आपली बैल जोड गमवावी लागली खरचं मन हेलावून टाकणारा असा हा प्रसंग आहे. यामुळे सुरेशचे अंदाजे ७० ते ८० हजारचे नुकसान झाले आहे. परत पुन्हा अशी बैलजोडी कशी घ्यायची आणि शेतीची कामे कशी करायची हा प्रश्न सुरेश समोर उभा आहे? या धक्क्यातून सावरायला ग्रामस्थांनी एकसंघ त्यांच्या सोबत राहून बैल खरेदी करण्यासाठी काय करता येतं का हे पाहण्याची गरज आहे.

No comments:

Post a Comment