श्री शिवशक्ती हायस्कूल अडकूर येथे विद्यार्थ्यांचे पुस्तके व फुले देवून स्वागत करताना प्राचार्य व्ही. एन. सुर्यवंशी |
अडकूर / सी. एल. वृत्तसेवा
सन २०२२-२३ या नवीन शैक्षणिक वर्षाला सोमवारपासून प्रारंभ झाला असला तरी प्रत्यक्ष शाळा आजपासून सुरू झाल्या. अडकूर (ता. चंदगड) केंद्रातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा मोठया उत्साहात सुरू झाल्या असून सर्वच शाळामध्ये आज विद्यार्थांचा किलबिलाट व उत्साह ऐकायला आणि पहायला मिळाला. कोरोनामुळे दोन वर्षानंतर पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने आज शाळा सुरू झाल्या. शाळांमध्ये तब्बल दोन वर्षांनी विद्यार्थी मूक्तपणे वावरताना दिसून आले. प्रवेशोत्सवांतर्गत पहिल्या दिवशी गुलाबपुष्प, पुस्तके देऊन ढोल ताशाच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत केले गेले. आयुक्त, शिक्षण उपसंचालक, प्राथमिक शिक्षणाधिकारी माध्यमिक व शिक्षणाधिकारी. विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांनी विविध शाळांना भेटी दिल्या.
तसेच दुपारी पोषण आहारामध्ये गोड - धोड पदार्थांच्या जेवनाचा बेत केला होता. कोल्हापूर जिल्ह्यातील २ हजार शाळांमध्ये लाखो विद्यार्थी उपस्थित होते. पालक व विद्यार्थ्यांकडूनही शाळेची तयारी पूर्ण करण्यात आली होती. आज या दिवसासाठी विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी शाळांकडून करण्यात आली होती. अडकूर येथील श्री शिवशक्ती हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे फुले व पुस्तके देवून स्वागत केले. यावेळी प्राचार्य व्ही. एन. सुर्यवंशी यांच्यासह पालक नामदेव गिलबिलेसह सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. याबरोबरच केंद्र शाळा अडकूर, बोंजूर्डी, मलगेवाडी, मोरेवाडी, उत्साळी, विझणे, अलबादेवी आदि गावातील शाळामध्ये केंद्रप्रमुख श्री. फर्नांडिस यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
आज शाळा सुरू झाल्याने खूप छान वाटले. ऑनलाईन अभ्यासाचा कंटाळा आला होता. सर्व मित्र - मैत्रिणी, शिक्षक भेटल्याने मनावरचा ताण कमी झाल्याने १० वीचा अभ्यास सोपा झाला.
No comments:
Post a Comment