'रवळनाथ' च्या चंदगड शाखेची प्रगती कौतुकास्पद - प्राचार्य डॉ. निपणळकर, १६ वा वर्धापन दिन उत्साहात - चंदगड लाईव्ह न्युज

18 June 2022

'रवळनाथ' च्या चंदगड शाखेची प्रगती कौतुकास्पद - प्राचार्य डॉ. निपणळकर, १६ वा वर्धापन दिन उत्साहात


रवळनाथच्या चंदगड येथील शाखा कार्यालयात सत्यनारायण पूजा व श्री रवळनाथ प्रतिमा पूजन झाले. यावेळी प्राचार्य आर. एस. निळपणकर,  संचालक प्रा. विजयकुमार घुगरे, महेश मजती, सौ. मीना रिंगणे, श्रीमती उमा तोरगल्ली, सौ. रेखा पोतदार, शाखा चेअरमन सौ. पुष्पा नेसरीकर, निंगाप्पा नेसरीकर, प्राचार्य शांताराम गुरबे, शाखाधिकारी दिपक शिंदे आदि मान्यवर.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      श्री रवळनाथ को - ऑप . हौसिंग फायनान्स सोसायटीच्या चंदगड शाखेचा १६ वा वर्धापन दिन उत्साहात पार पडला. चंदगड येथील कार्यालयात शाखा चेअरमन सौ. पुष्पा नेसरीकर व निंगाप्पा नेसरीकर यांच्या शुभहस्ते सत्यनारायण पूजा व 'श्री रवळनाथ प्रतिमेचे पूजन संस्थापक संचालक प्राचार्य आर. एस. निळपणकर यांच्या हस्ते व संचालक प्रा. विजयकुमार घुगरे, महेश मजती, सौ. मीना रिंगणे, श्रीमती उमा तोरगल्ली, सौ. रेखा पोतदार, प्राचार्य शांताराम गुरबे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.                याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर, हितचिंतक, सभासद, ठेवीदार, कर्जदार व ग्राहक यांनी संस्थेच्या यशस्वी वाटचालीचे कौतुक केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्राचार्य डॉ. आर. एस. निळपणकर म्हणाले, संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांचे कुशल नेतृत्व आणि सर्व संचालक, शाखा सल्लागार आणि चंदगड परिसरातील सभासद, ठेवीदार, कर्जदार आणि कर्मचाऱ्यांच्या एकजुटीच्या प्रयत्नामुळे डोंगराळ व दुर्गम प्रदेशात असणाऱ्या चंदगड तालुक्यात अल्पावधीत 'रवळनाथ शाखेने केलेली प्रगती कौतुकास्पद आहे. 

          शाखा चेअरमन सौ. पुष्पा नेसरीकर यांनी स्वागत केले.  प्रास्ताविकात शाखेच्या प्रगतीचा आढावा घेताला. चंदगड शाखेकडे १६ कोटीच्या ठेवी जमा झाल्या असून १४ कोटीची कर्जे वितरण केली आहेत. तसेच सध्या मोबाईल बँकिंग, सी. बी. एस., मायक्रो एटीएम, डेबिट कार्ड याव्दारे डिजीटल सेवा दिली जाते. तसेच RTGS / NEFT, लॉकर, वीज बीलभरणा यासह पेन्शनधारक व जेष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी नॅशनल अॅटोमेटेड क्लिअरिंग हाऊस (नॅच) ही सेवा तसेच गंभीर आजारी व वयोवृध्द ग्राहकांना घरपोच सेवा सुरु आहे. संस्थेमार्फत आकर्षक व्याजदर मिळणाऱ्या विविध ठेव योजनाना चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागता क्षणी पैसे परत मिळण्याची खात्री असल्याने ठेवीदारांची पसंती ' रवळनाथ ' लाच मिळत आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी प्रा. विजयकुमार घुगरे, महेश मजती, सौ. मीना रिंगणे, श्रीमती उमा तोरगल्ली, सौ. रेखा पोतदार, प्राचार्य शांताराम गुरबे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. शाखा सल्लागार प्रा. डॉ. आर. एन. साळुंके यांनी सूत्रसंचालन केले. शाखाधिकारी दिपक शिंदे यांनी आभार मानले. 

  या कार्यक्रमास शाखा सल्लागार नारायण काणेकर, ॲड. आर. पी. बांदिवडेकर, ॲड. विजय कडूकर, नगरसेवक सचिन नेसरीकर, नंदकुमार ढेरे, ॲड. विष्णू पाटील, प्रा. बी. एम. पाटील, शेखर वाली, प्रविण नेसरीकर, महेश निट्टुरकर, सटुप्पा पेडणेकर, संदीप नाईक, लेखापाल सतिश परीट यासह सभासद आणि कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment