साक्षी शिंदे साक्षी गावडे प्रतिमा मळवीकर |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
माध्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या माध्य. शालांत प्रमाणपत्र परीक्षेत श्री भावेश्वरी विद्यालय, नांदवडेचा निकाल १०० टक्के लागला. त्यापैकी प्रथम श्रेणीत ३२ व द्वितीय श्रेणीत ५ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकालाची परंपरा कायम राखली. विद्यालयातील साक्षी जयवंत शिंदे हिने ९४ टक्के, साक्षी रमेश गावडे ९०.६० टक्के व प्रतिमा परशराम मळवीकर ८८.६० टक्के अशी टक्केवारी विद्यालयात अनुक्रमे १ ते ३ गुणवंत विद्यार्थी ठरले.
सर्व विद्यार्थी-विद्यार्थीनींना मुख्याध्यापक एम. एल. कांबळे, सहा शिक्षक गावडे, डी. एस. कांबळे, व्ही. एन. कांबळे, सौ. कोरवी एस. आर. यांचे मार्गदर्शन लाभले. शालेय समिती चेअरमन एल. डी. कांबळे यांच्यासह सर्व संचालक पालक व ग्रामस्थांचे प्रोत्साहन लाभले.
No comments:
Post a Comment