चंदगड / सी. एल वृत्तसेवा
चंदगड पोलीस ठाण्यांतर्गत पाटणे पोलिस चौकीत कार्यरत असलेल्या पोलिस उपनिरीक्षकाला वडीलांविरुध्द दाखल असलेल्या एका गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी २० हजाराची लाच घेताना कोल्हापूर विभागाच्या लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. अमित भगवान पांडे ( वय वर्ष ३४, सध्या रा. पाटणे फाटा, मूळगाव खोतेवाडी, ता. हातकणगंले) असे लाच घेणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. हि कारवाई शनिवारी दुपारी पाटणे फाटा येथे करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, चंदगड पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पाटणे फाटा येथे दोनच महिन्यापूर्वी अमित पांडे रुजू झाले आहेत. दरम्यान एका प्रकरणात तक्रारदार व वडीलांविरुध्द असेलेल्या गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी पांडे यांने तक्रारदाराकडे ५० हजाराची लाच मागितली होती. अखेर त्यामध्ये तडजोड करुन ४० हजार ठरवण्यात आले. त्याचा पहिला हप्ता २० हजाराचा देताना आज पांडे यास माणगाव फाटा येथे लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. पोलीस उपअधिक्षक आदिनाथ बुधवंत, उपअधिक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधिक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन कुंभार, सुनील घोसाळकर, नवनाथ कदम, संदीप पडवळ, मयूर देसाई व सूरज अपराध यांनी ही कारवाई केली.
पाटणे फाटा ता. चंदगड येथील पोलिस चौकीत लाच घेताना लाचलुचपत विभागाने पोलीस उपनिरीक्षकावर केलेली ही वर्षभरातील दुसरी कारवाई आहे.
No comments:
Post a Comment