उत्साळी येथे सोमवारी ग्रामदैवत श्री भावेश्वरी देवी मंदिर वास्तूशांती व कळसारोहण सोहळा - चंदगड लाईव्ह न्युज

05 June 2022

उत्साळी येथे सोमवारी ग्रामदैवत श्री भावेश्वरी देवी मंदिर वास्तूशांती व कळसारोहण सोहळातेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

उत्साळी (ता. चंदगड) येथे दि. ६ जूनला  ग्रामदैवत श्री भावेश्वरी देवी मंदिर वास्तूशांती, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कळसारोहण सोहळा संपन्न होत आहे. 

डॉ. विश्वनाथ पाटील यांच्या अधिष्ठानाखाली संपन्न होणाऱ्या  या धार्मिक सोहळ्यामध्ये सोमवार दि. ६  जून ते शुक्रवार दि. १० जून पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये सोमवारी मुहुर्त मेढ ते देवदेवताना आवाहन करण्यात  येणार आहे. बुधवारी कळसारोहृन व भावेश्वरी मूर्ती मिरवणूक गुरूवार दि. ९ रोजी गणेश पूजन व शुक्रवार दि. १० रोजी महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. या बरोबरच राजेंद्रजी  मोरे (फलटन) यांचे किर्तन आयोजित केले आहे. तरी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन भावेश्वरी जिर्णोद्धार कमिटी व उत्साळी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. 

No comments:

Post a Comment