अर्जुनवाडी येथे आजी - माजी सैनिक वेल्फेअर असोसिएशनची स्थापना - चंदगड लाईव्ह न्युज

05 June 2022

अर्जुनवाडी येथे आजी - माजी सैनिक वेल्फेअर असोसिएशनची स्थापना

 

अर्जुनवाडी येथे  आजी -माजी सैनिक वेल्फेअर असोशिएशनची स्थापना करताना मान्यवर

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

अर्जुनवाडी (ता. गडहिंग्लज ) येथे आजी - माजी सैनिक वेल्फेअर असोसिएशनची स्थापना मोठ्या उत्साहात करण्यात आली. शिवप्रेमी चौकातून मान्यवरांची उघड्या जीपमधून लेझीमच्या तालावर नृत्य करत पाहुऱ्याची गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मुख्य चौकात ग्रामपंचायत कार्यालया जवळ असोसिएशनच्या फलकांचे अनावरण करण्यात आले.

   यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन कर्नल मारुती कंजारी यांच्या हस्ते करण्यात आले. गावचे सुपुत्र शहीद भिवा दुरगुडे हे 16 मे 2016 रोजी शहीद झाले होते. यावेळी विद्या मंदिर अर्जुन वाडी येथील शाळेत  मुलींनी देशभक्तीपर गाण्यावर लेझीम पथक सादर केले .सुषमा पाटील यांनी ये मेरे वतन के लोगो हे गीत सादर केले . यावेळी उपस्थितांच्या डोळ्यांमधून   पाणी वाहू लागले .उपस्थित मान्यवयांच्या प्रतिमेचेप्रतिमेचे स्फूर्ती पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . कार्यक्रमाचे अध्यक्ष कॅप्टन रविंद्र मंडलिक यांनी स्वागतात  गावच्या लोकसंख्येच्या मानाने सैनिकांची संख्या कमी आहे . नवीन उत्साही मुलांना भरतीसाठी  संघटना सर्वतोपरी सहकार्य करणार आहे . त्याचबरोबर सैनिकांच्या कडून सामाजिक कार्यात सहभाग घेतता जाईल . जो सैनिक सर्वोच्च बलिदान देऊ शकतो त्याची किंमत पैशामध्ये आपण करू शकत नाही . स्वच्छ मनाने देश सेवा त्याप्रमाणेच गावचे देणे लागत असल्याने चांगले काम करण्याच्या उद्देशाने संघटनेची स्थापना केलेली आहे .गावामध्ये 29 आजी-माजी सैनिक असून दोन प्यारा मिलिटरी सैनिक असल्याचे कॅप्टन मंडलिक म्हणाले

 अध्यक्ष कर्नल मारुती कजारी म्हणाले , सैनिक निवृत्तीनंतर सन्मानाने जगाला पाहिजे .देशाची सेवा बजावून आलेल्या सैनिकाला शासकिय कामात अडथळा येऊ नये यासाठी एकसंघ असणे गरजेचे आहे . 

  समीर खानोलकर (अध्यक्ष ) कोल्हापुर शहर सैनिक फेडरेशन म्हणाले, संघटनेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपायची आहे . ज्या गावात सैनिक तो प्रथम नागरीक असतो . निवृतीनंतर गावचे राजकारण न करता सामाजिक हित व आपले हित जोपासले पाहिजे  . सैनिक एकत्र आल्यास राजकारण बदलण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे . यावेळी यल्लापा झांगरुचे , दशरथ भिकले राजराम कोले , शशिकांत चौगुले ,वसंत गवेकर , सरपंच शामराव नाईक ,उद्योजक विजयराव मंडलिक , प्रमोद पाटील , राजू जाधव ,संजय मंडलिक, अशोक पाटील ' प्रकाश पाटील ,सयाजी पाटील


सचिव सयाजी देसाई खजिनदार लक्ष्मण पाटील, हणमत दोरुगडे, तुकाराम कांबळे, अर्जुन नाईक' राजाराम वाईंगडे आदि मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते .आभार मारूती पाटील यानी मानले. सुत्रसंचालन कृष्ण पाटील यांनी केले. 

 अर्जुनवाडी येथील ज्या सैनिकांच्या नावे घर आहे . त्यांचा घरफाळा माफ करण्यात येईल अशी घोषणा शामराव नाईक यांनी करून सैनिकांचा सन्मान केला.


No comments:

Post a Comment