पर्यावरण रक्षणाची शपथ घेताना. |
चंदगड/ सी. एल. वृत्तसेवा
शेकडो वर्षापासून पादचाऱ्यांचे उन्हापासून रक्षण करणारी रस्त्याच्या दुतर्फा असणारी झाडे आज माणसांच्या स्वार्थासाठी नामशेष होत आहेत . तर दुसरीकडे निसर्गचक्र बदललयं म्हणून निसर्गाच्याच नावान खडे फोडण्याचं काम माणूस करतोय . खरं तर पर्यावरण वाचवण्याची जबाबदारी ही प्रत्येकाची आहे . शालेय विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्व पटवून सांगितल्यास त्याच्या हातून नक्कीच पर्यावरण पुरक कार्य होते हाच धागा पकडून दि न्यू इंग्लिश स्कूल मधील उपक्रम शिल शिक्षक संजय साबळे यांनी मुलांच्यात निसर्गाची आवड निर्माण व्हावी , पर्यावरणाच्या उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग वाढावा या उद्देश्याने वार्षीक परीक्षा संपल्यावर मुलांना चिंच , करंजा , बहावा , सागवान , रेन ट्री चिक्कू , पेरु , फणस , आंबा इ झाडाच्या बीया संकलित करण्यास सांगितले. या उपक्रमास मुलांनी चांगला प्रतिसाद दिला . सुट्टीत मुलांना एकत्र करून शाळेच्या आवारात मातीच्या गोळ्यात संकलित केलेल्या बिया घालून त्याचे सीड बॉल बनविण्यात आले .
जागतिक पर्यावरण दिना निमित्त विद्यालयाच्या शेजारी ल ओसाड भागात हे सीड बॉल फेकण्यात आले . यावेळी विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षणाची शपथ घेतली .
उपक्रम शिल शिक्षक संजय साबळे म्हणाले की " विद्यार्थ्याना पर्यावरण सरंक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे याची जाणीव करून देणे ही काळाची गरज आहे अशा उपक्रमातून विद्यार्थ्यांचा सहभाग खूप महत्वाचा आहे . "
यावेळी पर्यावरण रक्षणाच्या घोषणा दिल्या . ग्रंथपाल शरद हदगल ,पुंडलिक गावडे , ऋतूजा शिंदे , वेदिका उंबरे , हर्षदा भवारी , स्नेहा जाधव , संस्कृती आनंदाचे , जैनब मुल्ला , प्राची उसुलकर , सतेज खंदाळे , कुणाल हिरेमठ आदिती काजीर्णेकर , मधुरा इलगे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
No comments:
Post a Comment