पारगड हेरिटेज रन ऑफ मॅरेथॉन स्पर्धात परशराम भोई व साक्षी हुक्केरी प्रथम - चंदगड लाईव्ह न्युज

05 June 2022

पारगड हेरिटेज रन ऑफ मॅरेथॉन स्पर्धात परशराम भोई व साक्षी हुक्केरी प्रथम

 

मॅरेथॉन स्पर्धांचे बक्षिस वितरण करताना आमदार राजेश पाटील तहसिलदार विनोद रणावरे , स्पर्धक व मान्यवर

पारगड / एस. के. पाटील - सी. एल. वृत्तसेवा

  निसर्ग संवर्धन व प्रबोधनासाठी जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्य साधून ५ जून २०२२ रोजी ' पारगड हेरिटेज रन ' मॅरेथॉन स्पर्धामध्ये गडहिंग्लजच्या परशराराम भोईने  व 

साक्षी हुक्केरी यानी २१ कि मी अंतर धावून प्रथम क्रमाक मिळवला .

 स्पर्धाचीआमदार राजेश पाटील यांच्या हस्ते उदघाटन झाले.

स्पर्धांचा निकाल पुढीलप्रमाणे

 *जॉय ऑफ जंगल=५ कि मी अंतर* *मुली* 

चंदना गोरूले ( महागाव )

वैष्णवी मणगुतकर( किणी )

सई  गडकरी 

 *मुले* 

अमोल फगरे ( गडहिंग्लज ) श्रीधर शिंदे ( नेसरी ) रमेश कांबळे ( महागाव )

१० कि मी ( जंगल ड्रीम )

महिला -

प्रथम -भक्ती पोटे ( महागाव )

द्वितीय = समिक्षा वाके ( शिरगाव )

तृतिय _सुमिता परब ( चंदगड )

पुरूष

प्रथम -अभिषेक नाईक

द्वितीय -अभिनय धुरे ( यंदगड )

 तृतिय-ओंकार गावडे ( चंदगड )

 *जॉय औफ जगल २१ कि मी* *मूली* 

प्रथम _साक्षी हुक्केरी ( गडहिंग्लज )

द्वितिय=निकिता नार्वेकर ( चंदगड ) 

*पुरूष* 

प्रथम .परशराम भोई ( गडहिंग्लज )

द्वितिय_ अनिकेत कुद्रे ( चंदगड )

तृतिय-भूषण पोटे ( महागाव )

 जनकल्याण संस्था मुंबई तसेच पारगड , मिरवेल , नामखोल ग्रुप ग्रामपंचायत , ऑल्टिट्यूड क्वेस्ट अॅडव्हेंचर एल.एल.पी , आउट प्ले स्पोर्ट्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने  ही स्पर्धा देशभरातील धावपटूंसाठी पर्वणी ठरली .छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ल्यावरून स्पर्धेत सहभागी होण्याची संधी स्पर्धकाना मिळाली आहे . जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ही स्पर्धा आयोजित केली आहे . या स्पर्धेच्या माध्यमातून चंदगड तालुक्यातील पर्यावरणासह पर्यटनाला प्रोत्साहन देण्याचे आयोजकांचे उद्दिष्ट होते . तसेच पर्यावरण संरक्षण , पर्यावरणाची होणारी हाणी टाळण्यासाठी करण्यात येणारे उपाय , त्याचबरोबर चंदगड तालुक्यातील निसर्गसौदर्य , वन संपदा , दुर्मिळ वनस्पती यांची माहिती इतरांना व्हावी अशी अपेक्षा ठेवून या महामॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले असून त्याद्वारे ही संपदा पोहचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. उदघाटन कार्यक्रमाला व पारितोषिक कार्यक्रमाला तहसिलदार विनोद रणावरे , 

पोलिस निरिक्षक संतोष घोळवे 'गटविकास अधिकारी चंद्रकांत 

बोंडरे  पाटणे विभाग वनक्षेत्रपाल  प्रशांत आवळे , चंदगड वनक्षेत्रपाल नंदकुमार भोसले , अभयबाबा देसाई '' विनोद पाटील ' कान्होबा माळवे ' सरपंच संतोष पवार यांच्यासह विविध  क्षेत्रातील मान्यवर मंडळी कर्नाटक महाराष्ट्र राज्यासह गोवा राज्यातील स्पर्धक मोठया संख्येने उपस्थित होते . विजेत्याना रोख रक्कम , प्रमाणपत्र व वन विभागाकडून रोपे भेट देण्यात आली.

No comments:

Post a Comment