चंदगडकरांनी घेतली गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट, चंदगड युवक मारहाण प्रकरणाची घेतली गंभीर दखल - चंदगड लाईव्ह न्युज

06 June 2022

चंदगडकरांनी घेतली गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट, चंदगड युवक मारहाण प्रकरणाची घेतली गंभीर दखलतेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

मागील आठवड्यात चंदगडच्या  ११ युवकांना गोवा राज्यात एका खोलित डांबून प्रचंड मारहाण करून लूटले होते. यानंतर या प्रकरणाचा गुन्हा गोवा पोलिसात अँड संतोष मळविकर यांच्या  प्रयत्नातून त्या पिडीत युवकानी नोंदवला होता .

चा प्रकरणाची  दखल गोवा , चंदगड सह कर्नाटकातील सोशत मिडीया व वृत्तपत्रानी घेतली . यानंतर गोवा पर्यटनमंत्र्यांनी संबंधित पोलिस स्टेशनला भेट देवून पोतिसाना आरोपिना पकडण्याच्या सक्त सूचना दिल्या होत्या यानंतर सहा आरोपिना पकडण्यात आले आज . अँड  संतोष मळविकर लक्ष्मण गावडे यानी मुख्यमंत्री  प्रमोद सावंत यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली . यावेळी या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री सावंत यानी दिले.No comments:

Post a Comment