माडखोलकर महाविद्यालयात जागतीक सायकल दिनानिमित्त सायकल रॅली काढण्यात आली.
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
र. भा. माडखोलकर महाविद्यालय, चंदगडच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने *आजादी का अमृत महोत्सव* या निमित्त दि ३ जून २०२२ रोज़ी जागतीक सायकल दिनाचे औचित्य साधून सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीला महाविद्यालयाच्या प्रांगणातून सुरुवात झाली, प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांनी स्वतः सायकल सवारी करत स्वयंसेवकाना प्रोत्साहन दिले. रॅली चंदगड शहरातून बाजारपेठ, रवळनाथ मंदिर, न्यायालय, यस्टी स्टेशन मार्गे पंचायत समिति समोरिल शहीद स्वातंत्र्य सेनानींच्या स्मृतिस्तंभापर्यत आली. तेथील परिसराची स्वच्छता केली. रॅलीद्वारे ग्रामस्थांचे प्रबोधन केले, यातून पर्यावरण संवर्धन, निसर्ग प्रेम, सायकल सवारीतून आरोग्य सुधार, व्यायाम, सर्वात महत्वपूर्ण इंधन बचत, आर्थिक बचत, परंपरागत चांगल्या प्रथांना उजाळा, संस्कृति जतन या व अशा अनेक गोष्टी समाजापर्यंत पोहोचविण्याचे कार्य स्वयंसेवकानी केले. सायकलवरून फिरण्याचा आनंदही प्राप्त केला.
स्वयंसेवकांनी यानिमित्त शहीद स्वातंत्र्य सेनानींच्या स्मृतिस्तंभाच्या परिसराची स्वच्छता केली. यातुन स्वच्छतेचा संदेश ही दिला. चंदगड न्यायालयचे न्यायाधीश, सर्व वकील मित्रही या रॅलीमध्ये सहभागी झाले. रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ एन. के पाटील, प्रा. संजय एन.पाटील, डॉ शाहू गावडे, प्रा आर. एस. पाटील, प्रा व्हि के गावडे, डॉ एन. एस. मासाळ, प्रा ए डी कांबळे, पी पी धुरी, विक्रम कांबळे व सहकारी यानी विशेष परिश्रम घेतले. यावेळी प्राचार्य, स्टाफ, स्वयंसेवक व ग्रामस्थ या रॅलीमध्ये सहभागी सर्वांचेच प्रकल्प अधिकारी प्रा. संजय पाटील यांनी आभार व्यक्त केले.
No comments:
Post a Comment