कानूर बुद्रुक येथील शेतकऱ्यांचा रस्त्यातील अतिक्रमण दूर न केल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा, उपविभागीय अधिकारी व चंदगड तहसीलदारांना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

06 June 2022

कानूर बुद्रुक येथील शेतकऱ्यांचा रस्त्यातील अतिक्रमण दूर न केल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा, उपविभागीय अधिकारी व चंदगड तहसीलदारांना निवेदन

 
रस्ता खुला करण्याबाबतचे निवेदन तहसिलदार यांना देताना कानूर बुद्रुक ग्रामस्थ.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

कानूर बुद्रुक (ता. चंदगड)  येथील शिवारातील रस्त्यात अतिक्रमण झाले आहे. ते न काढल्यास शुक्रवार दि. १० पासून गडहिंग्लज उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा कानूर बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी दिला आहे. या बाबतचे निवेदन चंदगडचे तहसिलदार विनोद रणवरे यांना दिले आहे. 

 प्रशासन दबावापोटी रस्ता खुला करू शकत नसेल तर गडहिंग्लज उपविभागीय कार्यालयासमेर दि. १० जूनपासून बेमुदत आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन संजय आगाशे, कृष्णा गणाचारी, शिवाजी साखरदांडे, सुमित देसाई यांनी चंदगडच्या तहसीलदारांना दिले आहे. 



No comments:

Post a Comment