महागाव येथील संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या १५५ हुन अधिक विद्यार्थ्याची विविध नामांकित कंपन्यामध्ये निवड - चंदगड लाईव्ह न्युज

06 June 2022

महागाव येथील संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या १५५ हुन अधिक विद्यार्थ्याची विविध नामांकित कंपन्यामध्ये निवड

निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्यासह प्राध्यापक.


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

            महागांव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयातील शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये शिक्षण घेत असलेल्या १५५ हुन अधिक विद्यार्थ्याची विविध नामांकित कंपन्यामध्ये निवड झाली असून यामध्ये सोपरा स्टेरिया (४ विद्यार्थी) कॅपजेमनी ( १९ ) टी. सी. एस (०९) अॅक्टी सिस्टीम (०२) अॅटॉस सिंटेल (०६) जीएस लॅब ( ०२ ) इन्फोसिस ( ३५ ) टेक महिंद्रा (०३) माईंड ट्री (०३) काळे लॉजिस्टीक (०२) क्यू स्पायडर (२६) अॅकसेंचर (०२) कॉग्नीझंट (०४) विप्रो (१३) जेबिल ग्रुप ( ०२ ) सेहगल अॅटो (०७) सुलजर (०६ ) RDC कॉकेट (०३) इंटेलेक्ट डिझाईन (०१) व वायचल ग्रुप ( ०८) या नामांकित कंपन्यामध्ये निवड झाली अशी व ०८ माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एच. सावंत यांनी दिली निवड झालेल्या विद्यार्थ्याचा संस्थापक अध्यक्ष अॅड. अण्णासाहेब चव्हाण, प्राचार्य डॉ संजय सावंत व सर्व विभागाचे विभागप्रमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

            निवड झालेल्या विद्यार्थ्याच्या मध्ये सपना पाटील, सागर देवडकर, ज्योती रोकडे व धनश्री नेवरेकर यांना सर्वाधिक वार्षिक वेतन ७ लाख पेक्षा जास्त रूपयांचे पॅकेज मिळाले अशी माहिती ट्रेनिंग प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा. संतोष गुरव व प्रा. महादेव बंदी यांनी दिली.

           निवड झालेल्या विद्यार्थ्याच्यामध्ये १५ पेक्षा जास्त विद्यार्थ्याना २ पेक्षा जास्त नामांकित कंपन्यामध्ये निवड झाली असुन यामध्ये बॉबी चिलमी, सनिका मुंगुरवाड़े, सिद्धी पाटील, रतन कराटे, परशराम रेडेकर, अनिता सुतार, ओमकार शिंदे व शशिकांत पाटील त्याचबरोबर इतरही विद्यार्थ्याचा समावेश आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेचे विश्वस्त डॉ. यशवंत चव्हाण, डॉ. संजय चव्हाण व सचिव अॅड. बाळासाहेब चव्हाण यांनी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment