हजारो शिवभक्ताच्या उपस्थितीत पारगड येथे शिवराज्यभिषेक सोहळा संपन्न, युध्दकलांची प्रात्यक्षिके सादर - चंदगड लाईव्ह न्युज

06 June 2022

हजारो शिवभक्ताच्या उपस्थितीत पारगड येथे शिवराज्यभिषेक सोहळा संपन्न, युध्दकलांची प्रात्यक्षिके सादर

                  पारगड (ता. चंदगड) येथे शिवराज्यभिषेक सोहळ्यावेळी भंडारा उधळण करताना शिवभक्त.


नंदकुमार ढेरे - चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

             मजरे कारवे (ता. चंदगड) येथील शहिद जवान वेलफेअर फौडेंशन, पारगड ग्रामस्थ व शिवप्रेमी यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ले पारगड (ता. चंदगड) येथे हजारो शिवप्रेमींच्या उपस्थितीत शिवराज्यभिषेक दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याचे विधीवत पुजन आम. राजेश पाटील व माजी मंत्री भरमुआण्णा पाटील यांच्या हस्ते करून अभिषेक घालण्यात आला.

 चंदगड वासीयांनी शिवराज्यभिषेक दिन सोहळा शिवाजी महांराजाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले पारगडवर साजरा केला. 
पोवाडा सादर करताना शाहीर.
           दरम्यान ५ मे रोजी पारगडवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सायंकळी आम.पाटील यांच्या हस्ते गड पुजन करण्यात आले. 

                    

         कोल्हापूर येथील शाहीर रंगराव पाटील यांनी  पोवाडे व गोंधळ गीते सादर केली. ६ मे रोजी सकाळी पहाटे ५: ३० वाजता काकड आरती व कारवे येथील कलावती महिला भजनी मंडळाने भजने सादर केली.

हलगी वाजविताना हलगीवादक.

             ध्वजारोहण व शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे यावेळी पुजन पुजारी दत्तात्रय जोशी याच्या हस्ते शस्त्र पुजा करुन भडांरा उधळण करण्यात आला. 


        यावेळी किल्ले गंधर्वगड व महिपाळगड येथून आलेल्या पालख्यांचे स्वागत करण्यात आले. 

      मावळ्यांनी परीधान केलेले भगवे फेटे, टोप्यांमुळे व महिलांनीही भगव्या साड्या व टोप्या परिधान केल्याने अवघा पारगड भगवामय झाला होता.

         त्यानंतर पालख्यांसह गडावर मिरवणुक काढण्यात आली. यानंतर मुख्य शिवराज्यभिषेक सोहळा मंत्र घोषात पार पडला. यावेळी हजारो शिवभक्त या मिरवणुकीत सहभागी झाले होते. 

          

         छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय शिवाजी, जय भवानी या घोषणांनी संपुर्ण पारगड दणाणून गेला.

  महाप्रसादाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते. चंदगड, आजरा, गडहिग्लज, बेळगाव, गोवा, सिंधुदुर्ग येथील शिवप्रेमीनीं उपस्थिती लावली होती. 

           या सोहळ्याला, पारगड जनकल्याण संस्थेचे कान्होबा माळवे, तटांमुक्त अध्यक्ष रघुवीर शेलार, सरपंच संतोष पवार, विलास आढाव, प्रकाश चिरमुरे, उपसरपंच पाडुरंग बेनके, राघोबा शिंदे, सरपंच शिवाजी तुपारे, संजय निट्टूरकर, एम. एम. तुपारे, एस. व्ही. गुरबे, अशोक हारकारे, तानाजी गडकरी, विलास पाटील, सरपंच विष्णु गावडे-पाटील

           विष्णू आढाव, सुर्यकांत पाटील, अभय देसाई, प्रताप सूर्यवंशी, सुनिल मालुसरे, रायबा मालुसरे, सुभाना धुळप, नामदेव सरनोबत, उपसरपंच गणपतराव पवार, नारायण गडकरी
चिमुकलीही या शिवराज्यभिषेक सोहळ्यात सहभागी झाले होती. 

संपत पाटील, नंदकुमार ढेरे, श्रीकांत पाटील, विलास कागणकर, नंदकिशोर गावडे यांच्यासह भगतसिंग अॅकॅडमीचे विद्यार्थ्यी व हजारो शिवभक्त उपस्थित होते. आभार माजी उपसरपंच निवृत्ती हारकारे यांनी मानले.

            संजय आवळे यांची हलगी शिवभक्तांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदु ठरली. शिवराज्यभिषेक सोहळ्यामध्ये लखन जाधव यांच्या टीमचा ढालपट्ट्याबरोबरच संजय आवळे यांची हलगी शिवभक्तांच्या अंगात वीरश्री संचारणारी ठरली. काल रात्री (ता. ५) पोवाडे, गोंधळगीते व हलगीच्या ठेक्यावर रात्र जागवली. अभिजित पाटणे यांनी सुरेख भजने सादर केली. तर या सोहळ्यासाठी विनायक गडकरी यांनी जिल्ह्यातील सात नद्यांसह अरबी समुद्रातील जल अभिषेकासाठी आणले होते.शिवभकत पराग निट्टूरकर यानी शिवभारत व बुध्दभुषण या ग्रंथाचे वाचन केले.

No comments:

Post a Comment