युवकांनी राष्ट्रीय एकात्मता व पर्यावरणाचे संवर्धन करावे - प्राचार्य डॉ. पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

06 June 2022

युवकांनी राष्ट्रीय एकात्मता व पर्यावरणाचे संवर्धन करावे - प्राचार्य डॉ. पाटील

शिवराज्याभिषेक दिन व पर्यावरण दिन साजरा करताना चंदगड महाविद्यालयाचे विद्यार्थ्यी.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        "आजच्या युवकांनी शिवचरित्रातून स्फूर्ती  व प्रेरणा घ्यायला हवी .संकुचित भावनाना मूठमाती देऊन राष्ट्रीय एकात्मतेचे संवर्धन केले पाहिजे. बहु - रत्ना वसुंधरेचे  संरक्षण व संवर्धन करण्यासाठी स्वतःपासूनच सुरुवात करायला हवी. आपल्या वैभवशाली परंपरेचा वारसा जतन करण्यासाठी अभ्यास करावा. "असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांनी केले. ते येथील माडखोलकर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व इतिहास विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या शिवराज्याभिषेक दिन व पर्यावरण दिन कार्यक्रमात बोलत होते. प्रारंभी प्रतिमेचे पूजन झाले. यावेळी इतिहास विभागाच्या 'शोध जाणिवांचा 'या भित्ती पत्रकाचे अनावरण झाले .प्रास्ताविक प्रा. एस. एन .पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. ए. डी. कांबळे यांनी केले तर  प्रा व्ही. के .गावडे यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्रा. टी. एम .पाटील, प्रा. डॉ. डी. ए. मोरे, प्रा. एस. व्ही. कुलकर्णी, प्रा. पूजा देशपांडे, प्रा. डॉ. जी. वाय कांबळे यांच्यासह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment