एम. ई. आर. सी. कंपनी बदलणे बाबत लवकर निर्णय घेऊ - आमदार राजेश पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

06 June 2022

एम. ई. आर. सी. कंपनी बदलणे बाबत लवकर निर्णय घेऊ - आमदार राजेश पाटीलचंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          महावितरणच्या अधिकारात येणाऱ्या कागणी फिडरवरती गेल्या दोन वर्षापासून एम. ई. आर. सी. कंपनीने आपल्या अधिकारात नदीकाठच्या मोटार धारकांची लाईट बिले विना रिडींग व जादा रकमेने आकारणी करत आहेत. त्यामुळे शेतकरी त्रस्त झालेत. एकूण ७५० पंप धारक आहेत. कोवाड, किणी, नागरदळे, कडलगे बुद्रुक, कडलगे खुर्द, सुंडी, करेकुंडी, ढोलगरवाडी, मांडेदुर्ग या गावच्या शेतकऱ्यांच्या वतीने आमदार राजेश पाटील  व महावितरण चे हेडऑफिस कोल्हापूर, गडहिंग्लज, चंदगड यांना निवेदन दिले होते. पण आजपर्यंत ठोस निर्णय न झाल्याने मोटार धारकांनी संजय कुट्रे यांच्या नेतृत्वाखाली शिनोळी येथे आमदार राजेश पाटील यांची  भेट घेऊन एम. ई. आर. सी. कंपनीकडून अधिकार महावितरण कडे देण्याचे निवेदन मोटार धारकांनी दिले. लवकरात लवकर निर्णय घ्या नाहीतर कागणी फिडर मोटार धारक महावितरण विरोधात आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नका.

         या वेळी प्रकाश पूजारी, विरुपोक्ष किणीकर, वसंत जोशीलकर, पुंडलिक नौकुडकर, जॉन लोबो, बाळकृष्ण गणाचारी, भैरी मोहणगेकर, वसंत सुतार, विजय मानवडकर, विष्णू मणगुतकर, जाणबा जोशीलकर इत्यादी शेतकरी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment