अबब ! चंदगड तालक्यात होणार चक्क अस्सल हिऱ्यांचे उत्पादन, हजारो युवकांना मिळणार रोजगार - चंदगड लाईव्ह न्युज

03 June 2022

अबब ! चंदगड तालक्यात होणार चक्क अस्सल हिऱ्यांचे उत्पादन, हजारो युवकांना मिळणार रोजगार

डायमंड कंपनिसंदर्भात माहिती देताना संभाजीराव देसाई

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

अबब ! चक्क चंदगड तालक्यात होणार  अस्सल हिऱ्यांचे उत्पादन ! बातमी वाचून आश्चर्य वाटले ना ?  हो खरच चंदगडच्या या कोकण भूमित शिरोलीचे संभाजीराव देसाई यांनी हिऱ्यांची कंपनी स्थापन करून हिऱ्यांचे उत्पादनही चालू केले आहे. या कंपनिच्या माध्यमातून आता चंदगड तालूक्यातील हजारो युवकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती कंपनिचे सर्वेसर्वा संभाजीराव देसाई यानी आज पत्रकार परिषदेत दिली.

  संभाजीराव देसाई पुढे बोलताना म्हणाले , चंदगड तालूका सर्वसंपन्न आहे . येथे आंबा , ऊस , काजू , फणसच पिकतात असे नाही तर येथून पुढे अस्सल हिरे सुद्धा तयार होणार आहेत . अव्यय डायमंड कंपनिच्या माध्यमातून चंदगड तालूक्यातील हजारो युवकांना रोजगार मिळणार आहे .केवळ या कंपनित हिरे तयार केले जाणार नाहीत तर युवकाना प्रशिक्षण देऊन त्यांचे कौशल्य विकसित करून स्वतःच्या पायावर उभे करण्यात येणार आहे .पहिल्या टप्यात २०० गरजू , होतकरू ज्याना खरचं नोकरीची गरज आहे अशा युवकांना हिऱ्यांना पैलू पाडायचे   प्रशिक्षण विद्या वेतन देऊन देण्यात येणार आहे . यासाठी शिक्षणाची अट नाही .केवळ शिकण्याची इच्छा असणाऱ्या युवकांना तात्काळ रोजगार देण्यात येणार आहे . सध्या मुंबई , गुजरात या ठिकाणी असणारा हा उद्योग कोल्हापूर जिल्हात प्रथम च सुरवात होत आहे . मला १९८८ पासून या क्षेत्रातील मिळालेल्या ज्ञानाचा वापर या हिऱ्यांच्या कंपनिसाठी करत असून चंदगड तालूक्यातीत हजारो युवकांना या निमित्ताचे रोजगार मिळणार असल्याची माहीती यावेळी संभाजीराव देसाई यानी दिली . 

या पत्रकार परिषदेला अॅड संतोष मळविकर, जयसिंग पाटील  ( सावर्डे ) उदय देसाई ( उत्साळी ) 'कल्लापा जोशी (कालकुंद्री ) राजू भोसले ( गवसे ) शिवाजी मणूरकर ( नागरदळे ) प्रकाश इंगवले (अडकूर ) हणमग कांबळे,

 ( ) पाटील (घुललेवाडी सरपंच ) विजय पाटील , प्रकाश देसाई ( कानडी ) विजय देसाई ( तळेवाडी ) अनिल कोले ( अलबादेवी ) आदि मान्यवर उपस्थित होते.




No comments:

Post a Comment