निनाद आजगांवकर यांच्या गायनाने चंदगडचे रसिक मंत्रमुग्ध - चंदगड लाईव्ह न्युज

03 June 2022

निनाद आजगांवकर यांच्या गायनाने चंदगडचे रसिक मंत्रमुग्ध

 

लोकमान्य सोसायटीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात गाताना स्वर-निनाद ची टीम. 

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

          सुप्रसिद्ध गायक निनाद आजगांवकर यांच्या सुमधुर गायनाने चंदगड व परिसरातील संगीत रसिक मंत्रमुग्ध झाले. लोकमान्य सोसायटी बेळगाव यांच्या वतीने गायक आजगांवकर यांच्या गायनाचा कार्यक्रम सोयरिक मंगल कार्यालय चंदगड येथे पार पडला. सहप्रायोजक म्हणून घोडावत कंजूमर, संजय घोडावत ग्रुप व तरुण भारत मीडिया पार्टनर यांचा सहभाग होता.

         

दिपप्रज्वलन करताना मान्यवर मंडळी. 

        दीप प्रज्वलन लोकमान्य सोसायटीचे संचालक गजानन धामणेकर यांच्या हस्ते झाले. प्रास्ताविकात संस्थेचे शाखाधिकारी प्रवीण कुडतूरकर यांनी पतसंस्थेची माहिती व प्रगतीचा आढावा सादर केला. ऋतुराज दळवी यांनी कार्यक्रम आयोजनाचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी गजानन धामणेकर आदींनी मनोगते व्यक्त केली. यावेळी गायक निनाद आजगावकर व राष्ट्रीय गायन स्पर्धेत सुवर्ण पदक विजेती सानिका धनाजी मुंगारे (शिवनगे) यांचा सत्कार करण्यात आला. 

         कार्यक्रमास नगराध्यक्षा प्राची काणेकर, क्षेत्रीय व्यवस्थापक दिलीप पाटील, जि. प. सदस्य सचिन बल्लाळ, नगरसेवक बाळासाहेब हळदणकर, राजेंद्र परीट, अरुण पिळणकर, सुजाता सातवणेकर, नेत्रदीपा कांबळे, विजयकुमार दळवी, राजू नाईक, हॉटेल प्रणामचे मालक लक्ष्मण गावडे, प्रा शांताराम गुरव, एन एस पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रवीण कुडतरकर, किर्ती कदम, आनंदा कुंभार, रमेश देसाई, अवधूत जांभीळकर, अरुण रेडेकर, अनिल कुंभार, यांनी परिश्रम घेतले. आभार संदीप नाईक यांनी मानले.

No comments:

Post a Comment