शिवसेना वर्धापन दिनानिमित्त फळे वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

19 June 2022

शिवसेना वर्धापन दिनानिमित्त फळे वाटप

 

शिवसेना वर्धापन दिनानिमित्त चंदगड ग्रामीण रुग्णालयात फळे वाटप करताना चंद्रकांत शिवणगेकर, महादेव गावडे आदी.

  चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
    हिंदू आणि हिंदुत्वाचे रक्षण, महाराष्ट्रातील मराठी माणसांच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईत १९ जून १९६६ रोजी शिवसेना संघटनेची स्थापना केली. ५६ वर्षापूर्वी सुरू केलेल्या शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आज चंदगड येथे रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले.
महागाव येथे शिवसेना प्रमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करताना अखलाक मुजावर


         ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण या तत्त्वानुसार बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. ५६ वर्षात शिवसेनेने अनेक लोककल्याणकारी कामे केली आहेत. संकटकाळी लोकांच्या मदतीला धावून जाण्याचा  शिवसेनेचा इतिहास आहे. वर्धापन दिनानिमित्त शिवसेनेचे अडकूर विभाग प्रमुख चंद्रकांत शिवणगेकर, माजी तालुकाप्रमुख महादेव गावडे, रवींद्र औंधकर यांनी शिवसैनिकांसह चंदगड ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फळांचे वाटप केले. यावेळी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
  याशिवाय महागाव (ता. गडहिंग्लज) येथे शिवसेना वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहकार सेना गडहिंग्लज तालुका संघटक अखलाकभाई मुजावर, सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडुरंग चौगुले व शिवसैनिक उपस्थित होते. 




No comments:

Post a Comment