ढेकोळीवाडीतील मुख्याध्यापकाच्या बदलीसाठी पालकांनी ठोकले शाळेस टाळे, वारंवार तक्रारी करूनही बदली करण्याकडे दुर्लक्ष - चंदगड लाईव्ह न्युज

19 June 2022

ढेकोळीवाडीतील मुख्याध्यापकाच्या बदलीसाठी पालकांनी ठोकले शाळेस टाळे, वारंवार तक्रारी करूनही बदली करण्याकडे दुर्लक्ष

 


तेऊरवाडी / सी .एल. वृत्तसेवा

  वारंवार मागणी केलेल्या मुख्याध्यापकांची बदली करण्याकरिता शिक्षण विभागाकडून गेली ५ वर्षे दुर्लक्ष झाले आहे . तर शिक्षक बदलीचा अर्ज देतो म्हणून वेळ मारुन नेत असल्याने वैतागलेल्या पालकांनी अखेर ढेकोळीवाडी (ता . चंदगड )येथील शाळेस विद्यार्थ्यांना बाहेर काढत कुलूप लावला. 

   . यापुढे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नसल्याचे ठाम मत व्यक्त करत अखेर गावातील महिला व ग्रामस्थांनी संपूर्ण शाळा खोल्यांना कुलूप लावत शिक्षण विभागासमोर शिक्षकाच्या बदली मागणीचे निवेदन दिले आहे . ग्रामशिक्षण कमिटीचे अध्यक्ष युवराज बाळेकुंद्री यांच्यासह महिला , पालक , विद्यार्थी यावेळी   उपस्थित होते  . गेल्या १२ वर्षांपासून एक शिक्षक शिक्षण विभागाच्या आशीर्वादाने ढेकोळीवाडी शाळेत ठाण मांडून आहे . शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा खालावला आहे . या शिक्षकाच्या बदलीकरिता अनेकवेळा तक्रारी करूनही या शिक्षकाची बदली झाली नाही अन तक्रार होऊनही हा शिक्षक स्वाभीमानाने शाळा सोडून इतरत्र बदली करून घेत नाही . याबाबत पालकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे . चार वर्षांपूर्वीही या शिक्षकाच्या बदलीकरिता पालकांनी शाळेस टाळे ठोकले होते . येथील मुख्याध्यापक पदाची धुरा सांभाळणाऱ्या या शिक्षकामुळे गेली १२ वर्षे येथील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा खालावला आहे . या शिक्षकामुळे १२ वर्षात १२ पिढ्यांचे वाटोळे या शिक्षकाला या ठिकाणी ठेवून शासनाने केले आहे . आणि शिक्षण खातेही या शिक्षकाच्या पाठीशी आहे हे दुर्देव म्हणावे आहे . बेळगाव येथे वास्तव्य करणाऱ्या शिक्षकाला येता जाता त्रास होत नाही . शिक्षण विभागाला मात्र आपल्या तब्येतीची तक्रार सांगत याच गावी ठाण मांडलेल्या या शिक्षकाची येथून कायमस्वरूपी बदलीचे आदेश होईपर्यंत शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय पालकांनी घेतला आहे , असे सरपंच नरसिंगराव पाटील यांनी सांगितले.





No comments:

Post a Comment