चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयात रौप्य महोत्सवाची जय्यत तयारी - चंदगड लाईव्ह न्युज

20 June 2022

चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयात रौप्य महोत्सवाची जय्यत तयारी



चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

           चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयाच्या स्थापनेला २५ वर्षे झाली असून त्यानिमित्त रौप्य महोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. महाविद्यालयाच्या तीनही शाखेतील  पदवीधरांच्या पहिल्या तुकडीच्या विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान केला जाणार आहे. 

          विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा, विविध स्पर्धा व उपक्रम, मनोरंजनाचे कार्यक्रम यांचे आयोजन करण्यात येणार आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांनी कार्यक्रमाच्या नेटक्या नियोजनासाठी विविध समित्या स्थापन केल्या आहेत. आजवर महाविद्यालयाने सामाजिक उत्तरदायित्वाला महत्त्व दिले असून पर्यावरण, देशभक्ती, जनजागृती व विविध समाज हिताचे उपक्रम राबविले आहेत. दिनांक ३१ जुलै व १ ऑगस्ट अशा दोन दिवसांच्या या कार्यक्रमानिमित्त महाविद्यालय अधिकाधिक लोकाभिमुख करण्यास प्राधान्य दिले जाणार असल्याची प्रतिक्रिया या महोत्सवाचे स्वागताध्यक्ष तथा प्राचार्य डॉ. पी. आर पाटील यांनी दिली.

No comments:

Post a Comment