चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व गुरुवर्य गुरुनाथ विठठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या पाच विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ मध्ये यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील पाच विद्यार्थाना एकूण ३०००० / (तीस हजार) रूपये शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. त्यामध्ये कुमार प्रसाद सटुप्पा पाटील (रक्कम रू. १००००) कुमारी सोनाली गोपाळ गडकरी (रक्कम रू. ५०००) कुमारी दिपा गंडू गावडे (रक्कम रू. ५०००) कुमारी श्रुत्री महादेव मठपती (रक्कम रू. ५०००) कुमारी सरीता रामू रामगावडे रक्कम (रू. ५०००) या विद्यार्थ्याचा समावेश आहे. दौलत विश्वस्त संस्थेचे जेष्ठ मार्गदर्शक गोपाळराव पाटील, अध्यक्ष अशोकराव जाधव, उपाध्यक्ष संजय पाटील, सचिव विशाल पाटील, प्राचार्य प्रा. पी. ए. पाटील, शिष्यवृत्ती विभाग प्रमुख प्रा. मधुकर जाधव, डॉ. ए. पी. गवळी, डॉ. आय. आर. जरळी, प्रा. ए. व्ही. नौकुडकर, प्रा. डी. जे. भोईटे, प्रा. शाहू गावडे, प्रा. व्ही. व्ही. कोलकार, प्रा. एस. पी. घोरपडे महाविद्यालयाचे कार्यालयीन अधिक्षक प्रशांत शेंडे व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment