चंदगडला २४ जुन रोजी पीक विमा शिबिर - चंदगड लाईव्ह न्युज

20 June 2022

चंदगडला २४ जुन रोजी पीक विमा शिबिरचंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          भारतीय किसान संघाच्या चंदगड शाखेतर्फे शुक्रवार दि. २४ जुन २०२२ रोजी राममंदिरात सकाळी १० ते १ वाजेपर्यंत किसान पीक योजना व विमा योजना शिबिर आयोजित केले आहे. तालुका कृषी अधिकारी सुनील जगताप मार्गदर्शन करणार आहेत. शेतकऱ्यांनी किसान संघाच्या येथील कार्यालयात संपर्क साधून नाव नोंदणी करावी, असे आवाहन अनिकेत मांद्रेकर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment