व्यावसायिक यशप्राप्तीसाठी आत्मविश्वास हेच भांडवल - चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष प्रल्हाद जोशी - चंदगड लाईव्ह न्युज

20 June 2022

व्यावसायिक यशप्राप्तीसाठी आत्मविश्वास हेच भांडवल - चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष प्रल्हाद जोशी

माडखोलकर महाविद्यालयात आयोजित व्यावसायिक दृष्टिकोन अभ्यासक्रमाच्या सांगता समारंभात बोलताताना प्रल्हाद जोशी.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          "दहा-बारा वर्षात सरकारी व निमसरकारी नोकऱ्यांचे प्रमाण खूपच घटले आहे. बहुराष्ट्रीय कंपन्या सेवा शाश्वती व स्थैर्य देत नाहीत. प्राप्त ज्ञानाला प्रत्यक्ष कृतीची जोड देऊन युवावर्गाने चिकाटीने व्यवसायाच्या क्षेत्रात पदार्पण केले पाहिजे. यशाचा मार्ग खडतर असला तरी जिद्द, चिकाटी, परिश्रम व दुर्दम्य आत्मविश्वासाच्या भांडवलावर एक यशस्वी उद्योजक बनणे शक्य आहे.' असे प्रतिपादन चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष प्रल्हाद जोशी यांनी केले. ते येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात आयोजित केलेल्या व्यावसायिक दृष्टिकोन अभ्यासक्रमाच्या सांगता समारंभात बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील होते.

        प्रारंभी प्रास्ताविक समन्वयक प्रा. एस. के. सावंत यांनी करुन व्यावसायिकांनी अपयशाने नाउमेद न होता डोळस दृष्टिकोनातून सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या जाणिवांच्या कक्षा विस्तृत कराव्यात व पुस्तकी ज्ञानापलीकडे जाऊन जीवन अनुभव समृद्ध बनवावे असे आवाहन केले. प्रा. ए. डी. कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. पूजा देशपांडे यांनी आभार मानले. प्रा. एस. व्ही. कुलकर्णी व प्रा. व्ही. के. गावडे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment