चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आजादी का अमृत महोत्सव व अंतरराष्ट्रीय योग दिन पूर्व तैयारी (काऊण्ट डाऊन) कार्यक्रम घेण्यात आला. कोल्हापुर जिल्हा समन्वयक प्रा. संजय पाटील यानी योग-प्राणायाम या विषयावर मार्गदर्शन केले. तानतनावाखाली जीवन जगणाऱ्या युवा पीढ़ीला आज योग-प्राणायामाची नितांत गरज आहे. धकाधकिच्या जीवनशैलीत स्वास्थ्य हरवून भौतिक साधनाना कवटाळणे कितपत योग्य आहे? यांचा विचार करून स्वयंसेवकानी आरोग्याची काळजी घ्यावी असा सूचक संदेश त्यांनी दिला. स्वयंसेवकाना प्रात्यक्षिकाद्वारे विभिन्न आसने शिकविली. यावेळी डॉ. शाहू गावडे, प्रा. सचिन पाटील, वीरधवल मुळीक, प्रा. व्ही. आर. कुंभार, स्वप्निल पाटील, विनायक गावडे व स्वयंसेवक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment