योग करताना विद्यार्थीं. |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
व्यक्तीमत्व विकासात योग साधनेला अनन्य साधरण महत्व आहे. शारिरीक चलनवलन आणि एकाग्रता वाढविणारी ही साधना प्रत्येकाने आत्मसात करायला हवी असे मत येथील दि न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक आर. पी. पाटील यांनी व्यक्त केले. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शाळेत योग शिबीर घेण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
शारिरीक शिक्षक टी. व्ही. खंदाळे यांनी विद्याथ्यांकडून सूर्यनमस्कार, प्राणायाम, ताडासन, वृक्षासन, शवासन, हास्यासन अशी विविध आसने करून घेतली. सौ. पुष्पा सुतार यांनी व्यायाम गीतावर मुलांना व्यायाम प्रकार घेतले. यावेळी सर्व अध्यापकांनी योगाची आसने केली. कार्यक्रमाला एन. डी. देवळे, टी. एस. चांदेकर, एम. व्ही. कानूरकर, जे. जी. पाटील, व्ही. के. गावडे, टी. टी. बेरडे, एस. जी. साबळे, डी. जी. पाटील, बी. आर. चिगरे, व्ही. टी. पाटील, एस. जे. शिंदे, सूरज तुपारे, विद्या डोंगरे, वर्षा पाटील, विद्या शिंदे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment