अडकूर येथील श्री शिवशक्ती हायस्कूलमध्ये योग करताना विद्यार्थी
अडकूर / सी. एल. वृत्तसेवा
अडकूर (ता. चंदगड) येथील श्री शिवशक्ती हायस्कूल व ज्यूनिअर कॉलजमध्ये २१ जून हा जागतिक योगदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
प्राचार्य व्ही. एन. सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा शिक्षक आय. वाय. गावडे यांनी योगा संदर्भात विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी ५ वी ते १२ पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यानी योग करण्यासाठी सहभाग घेतला होता. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment