पोलिसांच्या गोळीबारात फरारी गुंड गंभीर जखमी - चंदगड लाईव्ह न्युज

21 June 2022

पोलिसांच्या गोळीबारात फरारी गुंड गंभीर जखमी

जखमी गुंड विशाल सिंग

तेऊरवाडी / एस. के. पाटील

        बेळगाव येथील खुनाच्या गुन्ह्यातील फरारी विशाल सिंग विजयसिंह चव्हाण या गुंडावर पोलिसांनी गोळीबार करून त्याला जखमी केले आहे. भवानीनगर येथे झालेल्या बिल्डर राजू दोड्डभोम्मनावर याच्या खून प्रकरणी फरारी असलेला गुंड विशाल सिंग चव्हाण याचा पाठलाग करून पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला आहे. या गोळीबारात त्याच्या पायावर गोळी लागली असून तो जखमी झाला आहे. मंगळवारी सकाळी धर्मनाथ भवन जवळ ही घटना घडली आहे. त्याच्या मागावर असलेल्या पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न त्याने केला होता.

          मंगळवारी सकाळी वीरभद्र नगर धर्मनाथ भवन परिसरात हा थरार घडला . या घटनेत विशाल सिंह हा जखमी झाला असून उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या दोन महिन्यापूर्वी बिल्डर राजु दोड्डभोम्मनावर याचा खून झाला होता त्या प्रकरणांमध्ये विशाल सिंग हा फरारी होता. विशाल सिंग विजयसिंह चव्हाण (वय - 25) हा मूळचा कित्तुर तालुक्यातील चिक्कनंदी गावचा असून सध्या तोशास्त्रीनगर भागात वास्तव्यास होता. बेळगाव पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे सुपारी घेऊन खून करणाऱ्या आरोपींच्या मनात धडकी भरली असून या कारवाईचे बेळगाववासीयानी समर्थन केले.

No comments:

Post a Comment