माडखोलकर महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय `योग दिन`उत्साहात साजरा - चंदगड लाईव्ह न्युज

21 June 2022

माडखोलकर महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय `योग दिन`उत्साहात साजरा

 

माडखोलकर महाविद्यालयात योगदिन साजरा करण्यात आला. 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय `योग दिन` उत्साहात साजरा झाला." आजादी का अमृत महोत्सव 'योजनेअंतर्गत महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने उपक्रमाचे आयोजन केले होते. 

        यावेळी प्रा. डॉ. पी. एल. भादवणकर यांनी उपस्थित विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांना योगासने व प्राणायाम यांची प्रात्यक्षिके सादर केली. तसेच  त्यासंबंधी शास्त्रोक्त माहिती सादर केली व मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे समन्वयक प्रा. एस. एन. पाटील यांनी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष सहकार्य केले.

No comments:

Post a Comment