चंदगड येथे पंचायत समिती व आरोग्य विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा - चंदगड लाईव्ह न्युज

21 June 2022

चंदगड येथे पंचायत समिती व आरोग्य विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा

 

पंचायत समिती सभागृहात योगदिनिमित्त योगाचे प्रात्यक्षिक करताना 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

           चंदगड पंचायत समिती व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने चंदगड पंचायत समितीच्या सभागृहात मंगळवार २१ जून २०२२ रोजी योग दिन साजरा करणेत आला. या कार्यकमाला योग विद्याद्याम गउहिंग्लज या संस्थेचे योग शिक्षक अरविंद सावळगी यांनी मार्गदर्शक व विविध प्रात्यक्षिक आसने व प्राणायम करुन घेतले. 

            योग दिनाचा कार्यक्रम दोन तास संपन्न झाला. "योगदिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे होते. डॉ. बी. डी. सोनजाळ व डॉ. सुनिल हसुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाला पंचायत समिती व आरोग्य विभागाचे डॉ. स्नेहल थोरात, रवी पाटील, दीपक नाईक यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment