श्री भावेश्वरी चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर यांच्या वतीने सुळये येथील बेघर कुटुंबाला १० हजारांचा मदतीचा धनादेश, सी. एल. न्युजच्या व्हीडीओ बातमीच्या आवाहनाला प्रतिसाद - चंदगड लाईव्ह न्युज

22 June 2022

श्री भावेश्वरी चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर यांच्या वतीने सुळये येथील बेघर कुटुंबाला १० हजारांचा मदतीचा धनादेश, सी. एल. न्युजच्या व्हीडीओ बातमीच्या आवाहनाला प्रतिसाद

श्री भावेश्वरी चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर यांच्या वतीने सुळये येथील बेघर कुटुंबाला १० हजारांच्या मदतीचा धनादेश देताना ट्रस्टचे पदाधिकारी व सुळये येथील ग्रामस्थ.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

           सुळये (ता. चंदगड) येथील नागोजी माने या कर्त्या पुरुषाचे ८ जुन रोजी अचानक निधन झाले. त्यामुळे माने कुटुंबीय समस्यांच्या गर्तेत सापडले होते. ना रहायला घर ना गुंठाभर जमीन अशी अवस्था होती. याची माहीती मिळताच चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या चंदगड लाईव्ह न्युजने (सी. एल. न्युज) माने कुटुंबियांची परिस्थिती व्हीडीओ बातमीच्या माध्यमातून समाजासमोर आणली. यातून माने कुटुंबियांना मदत करण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत दोन दिवसापूर्वी श्री भावेश्वरी चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर या रेडेकर बंधूंनी सुरू केलेल्या ट्रस्ट मार्फत नुकताच रू. १०,००० रुपयांचा धनादेश ग्राम विकास शिक्षण मंडळ हेब्बाळ जलद्याळचे कार्याध्यक्ष सुभाष दावणे यांच्या हस्ते नम्रता व पार्वती माने यांच्याकडे सुपूर्द केला.

          माने कुटुंब ग्रामस्थ व पाहुण्यांनी उभ्या केलेल्या एका छोट्याश्या झोपडीत संसाराचा गाडा हाकत आहेत. घरचा कर्ता माणूस गेल्यामुळे या कुटुंबाची  अवस्था दयनीय झाली आहे. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी श्रीमती नम्रता नागोजी माने, एक मुलगी व दोन लहान मुले आणि सत्तर वर्षांची वृद्ध आई श्रीमती पार्वती धोंडीबा माने असा परिवार आहे. माने कुटुंबियांच्या करुन कहाणीची व्हिडिओ व बातमी सी. एल. न्युजवर बघितली. हेब्बाळ जलद्याळ, तालुका गडहिंग्लजचे डी. व्ही. रेडेकर यांच्या निदर्शनास आला. त्यानंतर त्यांनी या कुटुंबाची सर्व माहिती मिळवून त्यांना १० हजार रुपयांचा धनादेश मदत म्हणून दिला. यावेळी न्यू इंग्लिश स्कूल हेब्बाळ जलद्याळचे शिक्षक व सुळये येथील प्रतिष्ठित नागरिक शामराव कांबळे, बाळू कांबळे, विष्णू वंजारे, भैरव कांबळे,  जयदीप माळी व अंगणवाडी सेविका विद्या कांबळे उपस्थित होते. 

            माने कुटुंबिया बेघर असून कर्ता पुरुष गेल्याने आर्थिक विवंचनेत आहे. पावसाळ्चाच्या पार्श्वभूमीवर त्यांना निवारा उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. पै-पाहुणे व ग्रामस्थ यांनी तात्पुरता निवारा म्हणून चारही बाजूंनी ताडपत्री बांधून झोपडी उभे केली आहे. यामध्ये ते सद्या रहात आहे. मात्र मोठ्या पावसामध्ये या झोपडीमध्ये वास्तव्य करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे त्यांना घर बांधकामासाठी समाजातील दानशुर व्यक्तींनी सढळ हाताने मदत करण्याची गरज आहे. त्यामुळे अशा बेघर कुटुंबाला निवारा मिळेल.

           सुळये (ता. चंदगड) येथील नागोजी माने या कर्त्या पुरुषाचे अचानक निधन झाले. त्यामुळे माने कुटुंबीय समस्यांच्या गर्तेत सापडले होते. ना रहायला घर ना गुंठाभर जमीन अशी अवस्था होती. याची माहीती मिळताच चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या चंदगड लाईव्ह न्युजने (सी. एल. न्युज) माने कुटुंबियांची परिस्थिती व्हीडीओ बातमीच्या माध्यमातून सर्वप्रथम समाजासमोर मांडली. यातून माने कुटुंबियांना मदत करण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत दोन दिवसापूर्वी श्री भावेश्वरी चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर या रेडेकर बंधूंनी सुरू केलेल्या ट्रस्ट मार्फत नुकताच रू. १०,००० रुपयांचा धनादेश ग्राम विकास शिक्षण मंडळ हेब्बाळ जलद्याळचे कार्याध्यक्ष सुभाष दावणे यांच्या हस्ते नम्रता व पार्वती माने यांच्याकडे सुपूर्द केला.

                       सुळये येथील माने कुटुंबियांची सद्यस्थिती पाहण्यासाठी वरील व्हिडीओ पहा.

         माने कुटुंब ग्रामस्थ व पाहुण्यांनी उभ्या केलेल्या एका छोट्याश्या झोपडीत दिवस काढत आहे. घरचा कर्ता माणूस गेल्यामुळे या कुटुंबाची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी श्रीमती नम्रता नागोजी माने, एक मुलगी व दोन लहान मुले आणि सत्तर वर्षांची वृद्ध आई श्रीमती पार्वती धोंडीबा माने असा परिवार आहे. माने कुटुंबियांच्या करुन कहाणीची व्हिडिओ बातमी सी. एल. न्युजवर बघितली. हेब्बाळ जलद्याळ, तालुका गडहिंग्लजचे  डी. व्ही. रेडेकर यांच्या निदर्शनास आला. त्यानंतर त्यांनी या कुटुंबाची सर्व माहिती मिळवून त्यांना १० हजार रुपयांचा धनादेश मदत म्हणून दिला. यावेळी न्यू इंग्लिश स्कूल हेब्बाळ जलद्याळचे शिक्षक व सुळये येथील प्रतिष्ठित नागरिक शामराव कांबळे, बाळू कांबळे, विष्णू वंजारे, भैरव कांबळे,  जयदीप माळी व अंगणवाडी सेविका विद्या कांबळे उपस्थित होते. 

           आपली छोटीशी मदत एखाद्या कुटुंबाला निवारा देवू शकते, दानशुर व्यक्तींनी मदत करण्याची गरज          

         माने कुटुंबिया बेघर असून कर्ता पुरुष गेल्याने आर्थिक विवंचनेत आहे. पावसाळ्चाच्या पार्श्वभूमीवर त्यांना निवारा उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. पै-पाहुणे व ग्रामस्थ यांनी तात्पुरता निवारा म्हणून चारही बाजूंनी ताडपत्री बांधून झोपडी उभे केली आहे. यामध्ये ते सद्या रहात आहे. मात्र मोठ्या पावसामध्ये या झोपडीमध्ये वास्तव्य करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे त्यांना घर बांधकामासाठी समाजातील दानशुर व्यक्तींनी सढळ हाताने मदत करण्याची गरज आहे. त्यामुळे अशा बेघर कुटुंबाला निवारा मिळेल.

No comments:

Post a Comment