चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
माणगाव (ता. चंदगड) येथील शेतकरी सुबराव बुधाजी होनगेकर यांची हिरो होंडा स्पेंल्डर गाडी शेतातून चोरली.
सुबराव होनगेकर हे माणगाव-कोवाड रस्त्यावर गोंडा नावाच्या शेतात कुटुंबियांसमवेत सकाळी १॰.वाजता आपली हिरोहोंडा स्पेंल्डर (गाडी नं.MH09-BD-4428) हि दुचाकी गाडी लाॅक करून गेले होते. पेरणी करून आल्यानंतर पाहिले असता दुचाकी गाडी जाग्यावर नव्हती. गाडीची शोधाशोध केली असता मिळून आली नाही. त्यामुळे होनगेकर यांनी गाडी चोरीस गेल्याची तक्रार चंदगड पोलिसात दिली आहे. माणगाव ते कोवाड परिसरात पंधरा दिवसांत चार गाड्या चोरीस गेल्याच्या तक्रारी आहेत. चंदगड पोलिसांनी या गाड्या चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
No comments:
Post a Comment