शिनोळीची शिवानी पाटील पदवीपूर्व परिक्षेत गुणवत्ता यादीत, अर्थशास्त्र विषयात मिळवले १०० गुण - चंदगड लाईव्ह न्युज

19 June 2022

शिनोळीची शिवानी पाटील पदवीपूर्व परिक्षेत गुणवत्ता यादीत, अर्थशास्त्र विषयात मिळवले १०० गुण

 

शिवानी पाटील हिचे अभिनंदन करताना आई वडील

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

बेळगाव येथील मराठा मंडळ प्री - युनिव्हर्सिटी कॉलेजचा यंदाचा पदवीपूर्व द्वितीय वर्ष परीक्षेचा निकाल 64 टक्के लागला असून या कॉलेजमधील 533 पैकी 338 विद्यार्थी - विद्यार्थिनी उत्तीर्ण झाले आहेत. यापैकी 38 विद्यार्थी हे विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. कु. शिवानी प्रशांत पाटील (शिनोळी (ता. चंदगड) या विद्यर्थिनीने अर्थशास्त्र विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून विद्यापीठ गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे.

शिवानी पाटील 

मराठा मंडळ प्री - युनिव्हर्सिटी कॉलेजमधील आदिती एस. पाटील ही 576 गुण मिळवून कॉलेजमध्ये प्रथम आली असून प्राची पी. पाटील (574 गुण) हिने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे . मृणालिनी कदम व मानसी पवार या दोघी प्रत्येकी 556 गुण मिळवून संयुक्त तिसऱ्या क्रमांकावर आहेत. मराठा मंडळ प्री - युनिव्हर्सिटी कॉलेजमधील टॉपर्स पुढील प्रमाणे आहेत. वैष्णवी पाटील (562 गुण) , मानसी पवार (556), मृणाली कदम   ( 556), अश्विनी आर. ( 554 ), किरण गुरव ( 550 ), ऋतुजा मोरे ( 548 ), वैशाली वनपुरी ( 548 ) , भूमिका राहुल ( 545 ) , शिवानी पाटील ( 545 ) , सुहानी आनंदाचे ( 545 ) , प्रवीण धामणेकर ( 543 ) , रसिका बांदिवडेकर ( 543 ) , स्वाती पाटील ( 543 ) , राधिका कणबर्गी (741), निलेश भातकांडे (512) आणि संगीता तारीहाळकर (511 गुण). या सर्व विद्यार्थी - विद्यार्थिनींना मराठा मंडळ संस्थेच्या अध्यक्षा सौ. राजेश्री नागराजू यांचे प्रोत्साहन तसेच कॉलेजचे प्राचार्य एस. पाटील आणि प्राध्यापक वर्गाचे मार्गदर्शन लाभले. परीक्षेतील यशाबद्दल या सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. कु शिवानी ही शिनोळी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत पाटील यांची कन्या होय.





No comments:

Post a Comment