चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
सैनिक टाकळी (ता. शिरोळ) येथील जवान दिगंबर कृष्णाजी चव्हाण वय २५ यांचे दि. ९ जुलै रोजी अपघाती निधन झाले. त्यांचे पार्थिव मूळ गावी सैनिक टाकळी येथे आणण्यात आले. काल बेळगाव येथील आर्मी पथकाकडून मानवंदना देऊन त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
माजी सैनिक असलेले वडील आजारी असल्यामुळे त्यांना पाहण्यासाठी दिगंबर पंधरा दिवसाची सुट्टी घेऊन घरी आला होता. हॉस्पिटल मधील वडिलांना पाहून घरी परतत असताना जयसिंगपूर शिरोळ मार्गावर झालेल्या अपघातात दिगंबर गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ सांगली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तथापि प्रकृती अधिक चिंताजनक झाल्याने कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात केले होते. तथापि उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.या दुर्दैवी घटनेमुळे शिरोळ तालुक्यासह जिल्ह्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई-वडील, चार बहिणी असा परिवार आहे. अंत्यसंस्कार प्रसंगी शिरोळचे तहसीलदार, नायब तहसीलदार, पोलीस व अन्य शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
काँगो, दक्षिण आफ्रिका येथील शांती सेनेत कार्यरत असलेले भारतीय सेनादलातील अधिकारी सुभेदार मेजर गजानन चव्हाण (७ मराठा) व सुभेदार मेजर रवींद्र चव्हाण (१२ मराठा) निपाणी यांचे ते पुतणे होत.
No comments:
Post a Comment