महावितरणने मीटर टेस्टिंग चंदगड मध्येच करावे, विविध मागण्यांचे अधिकाऱ्यांना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

11 July 2022

महावितरणने मीटर टेस्टिंग चंदगड मध्येच करावे, विविध मागण्यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

वीज कंपनी अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देताना नगरसेवक आनंद उर्फ बाळासाहेब हळदणकर व नागरिक
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
   मीटर टेस्टिंग साठी चंदगड मधील ग्राहकांना गडहिंग्लजला हेलपाटे मारावे लागत आहेत. हे मीटर टेस्टिंग चंदगड मध्येच व्हावे. अशी मागणी चंदगड नगरपंचायतीचे नगरसेवक व जैवविविधता कमिटी सदस्य आनंद उर्फ बाबुराव हळदणकर यांनी वीज कंपनी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
 चंदगड हा दुर्गम व डोंगराळ तालुका असून चंदगड ते गडहिंग्लज अंतर मोठे आहे. त्यामुळे मीटर टेस्टिंग सह अनेक बाबींसाठी येथील ग्राहकांना गडहिंग्लजला जाणे परवडणारे नाही. याची दखल वीज कंपनी व शासनाने घ्यावी. तक्रार कक्ष चंदगड पासून दूर अंतरावर असल्यामुळे यासाठीही नागरिकांची कुचंबणा होते. तो चंदगड शहरात ठेवण्यात यावा. चंदगड शहरातील अनेक डीपी बॉक्सची अवस्था दयनीय झालेली आहे. याची देखभाल दुरुस्ती राम भरोसे आहे. त्यामुळे वीज पुरवठा वारंवार खंडित होतो. शहर व परिसरात खांबावरून गेलेल्या तारांना झाडांच्या फांद्या लागत स्पर्श करत असल्यामुळेही वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. तरी अशा झाडांच्या फांद्या तात्काळ तोडून वीजपुरवठा सुरळीत करावा. असे निवेदनात म्हटले आहे. 
  वीज कंपनी अधिकाऱ्यांना निवेदन देताना बाळासाहेब हळदणकर यांच्या समवेत कलीम मदार, हनीफ सय्यद, शाबुद्दीन नाईक आदींची उपस्थिती होती.


.

No comments:

Post a Comment