चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ५ गट व पंचायत समिती १० गण निश्चित झाले असून अंतिम प्रभागरचनाही प्रसिद्ध झाली आहे. आता त्याचे आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. जि.प. गटाचे आरक्षण जिल्ह्याधिकारी कार्यालयात व प.स.गणांची आरक्षण सोडत चंदगड येथील तहसील कार्यालयातील सांस्कृतिक सभागृहात काढण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार विनोद रणवरे यानी दिली.
चंदगड तालुक्यातील जि.प.गट व पं. स. गणांची १३ जुलै रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. त्यात जिल्हा परिषद गटांची जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत तर पंचायत समिती गणांची आरक्षण सोडत तहसील कार्यालयात तहसीलदार यांच्या उपस्थित होणार आहे. तसेच जिल्हाधिकारी १५ जुलै रोजी आरक्षणाची प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध करणार आहेत. १५ ते २१ जुलैदरम्यान, आरक्षणावर हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२२ साठी निर्वाचन गट आणि गणांची प्रभागरचना अंतिम झाली आहे. नव्या रचनेनुसार १ गट व २ गण नव्याने तयार झाले त्यानुसार एकूण ५ गट व १० गणांची आरक्षण सोडत काढली जाणार आहे.
पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध झाला आहे तर निवडणूक विभागानुसार मतदार यादी देखील
१८ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्याच अंतर्गत जिल्हा परिषदेच्या ५ गट आणि पंचायत समितीचे १० गण निश्चित झाले असून अंतिम प्रभागरचनाही प्रसिद्ध झाली आहे.
त्यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व महिला (अ. जा, अ. ज व सर्वसाधारण) यांच्याकरिता आरक्षण सोडतीची सूचना ७ जुलैला प्रसिद्ध केली आहे. त्यानंतर १३ जुलै रोजी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद गट आणि तहसीलदार यांच्या उपस्थितीत पंचायत समिती गणांची आरक्षण सोडत काढली जाणार आहे. जिल्हाधिकारी १५ जुलै रोजी आरक्षणाची प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध करणार आहेत. १५ ते २१ जुलैदरम्यान, आरक्षणावर हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत.या सोडती दरम्यान नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन निवासी नायब तहसीलदार हेमंत कामत यानी केले आहे.
No comments:
Post a Comment