चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयात देशभक्तीपर गीत स्पर्धा - चंदगड लाईव्ह न्युज

10 July 2022

चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयात देशभक्तीपर गीत स्पर्धा



चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात दि. ११ जुलै रोजी देशभक्तीपर समूहगीतस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. न्यू इंग्लिश स्कूलच्या गोगटे सभागृहात सकाळी ठीक दहा वाजता स्पर्धेला सुरुवात होणार आहे. 

       सुप्रसिद्ध ज्वेलर्सचे शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते उद्‌घाटन होणार असून अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील हे असतील. स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. पहिले तीन क्रमांक व उत्तेजनार्थ क्रमांक मिळवणाऱ्या स्पर्धकांना अनुक्रमे चार, तीन हजार, दोन हजार, एक हजार व प्रमाणपत्रेदिली जाणार आहेत.  सदर स्पर्धेसाठी स्पर्धकांनी जास्तीत जास्त संख्येने वेळेत उपस्थित रहावे. असे आवाहन सांस्कृतिक समितीचे प्रमुख प्रा. ए. डी. कांबळे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment