ओलमच्या वतीने तुर्केवाडी येथे मंगळवारी शेतकऱ्यांना हुमणी किडीबाबात मार्गदर्शन - चंदगड लाईव्ह न्युज

10 July 2022

ओलमच्या वतीने तुर्केवाडी येथे मंगळवारी शेतकऱ्यांना हुमणी किडीबाबात मार्गदर्शन



चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          तुर्केवाडी (ता. चंदगड) येथे राजगोळी खुर्द येथील ओलम (हेमरस) साखर कारखान्यामार्फत मंगळवार दि १२ जुलै रोजी सकाळी १० वाजता ब्रम्हलिंग मंदिरात मध्ये, 'ऊस उत्पादन वाढ तंत्रज्ञान किड, रोग व्यवस्थापन (हुमणी/रोटा) या ऊसावर पडण्याऱ्या किडीबाबात मार्गदर्शन आयोजन करणेत आले आहे.

           यावेळी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी, पुणेचे माजी ऊस पिक शास्त्रज्ञ  माने - पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत. तरी या मार्गदर्शन मेळाव्याचा लाभ उस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी- वाहतुकदार, शेतकरी मित्र, सेवा संस्था, दुध उत्पादक संस्थाचे आजी-माजी पदाधिकारी, ग्रामपंचायत आजी-माजी पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी घ्यावा असे आवाहन तुर्केवाडी ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment