अथर्व - दौलत साखर कारखान्यात रोलर पुजन, ७ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट - चंदगड लाईव्ह न्युज

10 July 2022

अथर्व - दौलत साखर कारखान्यात रोलर पुजन, ७ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट

हलकर्णी ता.चंदगड येथील अथर्व-दौलत कारखान्यात युनिट हेड ए. आर. पाटील यांच्या हस्ते मिल रोलर पूजन करण्यात आले.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         हलकर्णी (ता. चंदगड)  येथील अथर्व संचलित दौलत साखर कारखान्यात २०२२-२३ गळीत हंगामाच्या मील रोलर पुजनाचा कार्यक्रम कारखान्याचे युनिट हेड ए. आर. पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कंपनीचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक मानसिंग खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची वाटचाल सुरु असून कारखान्याने गेले तीन गळीत हंगाम यशस्विरित्या पुर्ण केले आहेत. 

          त्याचप्रमाणे मागील हंगामामध्ये कारखान्याने ५४१००० मे.टन गाळप केले आहे व तसेच गतवर्षी नव्याने सुरु करण्यात आलेला ७० केएलपीडी आसवानी प्रकल्प यशस्विरित्या कार्यान्वीत केला आहे. सदर उपपदार्थ प्रकल्पामुळे आर्थिक लाभ होणार असून त्याचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे. येणाऱ्या गळीत हंगामामध्ये पूर्ण क्षमतेने गाळप करण्यासाठी कारखाना व्यवस्थापनाने तोडणी व वाहतुक यंत्रणा ट्रक, ट्रॅक्टर ट्रॅक्टर छकडा असे एकूण ६०५ करार केले असून त्यापोटी कारखाना व्यवस्थापनामार्फत सदर यंत्रणेला पहिली उचल वाटप करण्यात आलेली आहे. 

            सध्या कारखान्यातील यंत्र सामुग्रीचे देखभाल व दुरुस्तीची कामे वेगाने सुरु असून शासनाच्या धोरणानूसार कारखाना लवकर सुरु करण्याचा व्यवस्थापनाचे नियोजन आहे.  त्याचप्रमाणे कारखान्याकडे  कार्यक्षेत्रातील   इतकी नोंद  झाली आहे.आणि  त्यानूसार कारखान्याचे गळीत हंगाम २०२२-२३ साठील ७ लाख  मे. टन गाळपाचे उद्दिष्ट आहे.यावेळी कारखान्याचे संचालक  विजय पाटील,  सेक्रेटरी विजय मराठे, चिफ इंजिनिअर पी. बी. पाटील, प्रोसेस हेड दिलीप पाटील, केन मॅनेजर सदाशिव गदळे, डिस्टीलरी मॅनेजर विजयकुमार पाटील, एच. आर. मॅनेजर जी. एस. पाटील, सिव्हील इंजिनिअर दिपक शिंदे, डे. फायनान्स मॅनेजर ओंकार शिंदे तसेच कारखान्यातील सर्व अधिकारी व  कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment