भाजपचे राज्य कार्यकारणी सदस्य शिवाजी पाटील यांना राज्यपाल नियुक्त आमदार पदाची संधी मिळावी, चंदगड मतदारसंघातील भाजपा समर्थकांनी उपमुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांकडे मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

10 July 2022

भाजपचे राज्य कार्यकारणी सदस्य शिवाजी पाटील यांना राज्यपाल नियुक्त आमदार पदाची संधी मिळावी, चंदगड मतदारसंघातील भाजपा समर्थकांनी उपमुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांकडे मागणी

शिवाजीराव पाटील

नंदकुमार ढेरे / चंदगड - सी. एल. वृत्तसेवा

            २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पहिल्याच प्रयत्नात ५१ हजार मते घेत निसटता पराभव झालेले भाजपचे राज्य कार्यकारीनी सदस्य शिवाजी पाटील यांची राज्यपाल नियुक्त विधान परिषदेवर निवड करावी, अशी मागणी चंदगड विधानसभा मतदारसंघातील भाजपा समर्थकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे केली आहे.

         चंदगड तालुक्यात २०१९ च्या अतिवृष्टीत नागरिकांना प्रचंड हाल सोसावे लागले. यावेळी  गावोगावी जाऊन त्यांनी ठाणे येथील स्वामी प्रतिष्ठानच्या माध्यमातूनमदतीचा हात दिला. काही गोरगरीब शेतकऱ्यांची घरे उभी केली. गोरगरिबांचे अश्रू पुसण्याचे काम केले. तर कोरोना महामारीत रेमडिसेव्हीअरचा आणि ऑक्सीमीटरचा प्रचंड तुटवडा असताना गरजूंना मोफत पुरवठा करून अनेकांचे प्राण वाचविले. याचबरोबर भाजपाचे विचार जनमानसत पोहचवून मतदारसंघात त्यांनी संघटनात्मक बांधणी केलेली आहे. 

           चंदगड विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे विचार रूजवून अत्यल्प कालावधीत लोकांच्या हृदयात स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण करत ५१ हजार मते मिळविणाऱ्या भाजपा राज्य कार्यकारीनी सदस्य  व राज्य माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजी पाटील हे आपल्या जन्मभूमीच्या विकासाचे स्वप्न बाळगून सक्रिय राजकारणात सहभागी झाले. भाजपाची उमेदवारी शिवाजी पाटील यांनाच मिळणार असे दिसत असतानाच शिवसेना - भाजपा युतीत हा मतदार संघ शिवसेनेकडे गेला. त्यावेळी भाजपा प्रणीत उमेदवार म्हणून शिवाजी पाटील यांनी निवडणूक लढविली. त्यांना त्या निवडणुकीत विक्रमी ५१ हजार मते मिळाली. पण राष्ट्रवादीकडून निसटत्या मतांनी पराभूत व्हावे लागले. पराभवानंतर खचून न जाता त्यांनी भाजपाचे कार्य अखंड पुढे चालू ठेवले. 

           राज्य माथाडी संघटना, बेस्ट कामगार संघ आणि सुरक्षा रक्षक कामगार संघाचे अध्यक्ष म्हणूनही ते कार्यरत आहेत. शिवाजी पाटील यांचे मूळ गाव चंदगड तालुक्यातील इनाम सावर्डे आहे. कर्मभूमी ठाणे असली तरी त्यांनी जन्मभूमीची नाळ कधी तोडली नाही. पक्ष वाढीसाठी त्यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील  जोमाने सुरू आहे. शिवाजी पाटलांसारख्या निष्ठावंत आणि प्रामाणिक कार्यकर्त्याला संधी देऊन चंदगड तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात पक्षवाढीसाठी पाठबळ द्यावे, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे.

आमदारकीमुळे चंदगडकरांना दुहेरी फायदा

               केंद्रात भाजपची सत्ता आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष पण कोल्हापूरचे आहेत. मात्र ऐतिहासिक वारसा जपलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात भाजपचा एकही आमदार नाही. शिवाजी पाटील यांची राज्यपाल नियुक्त आमदारपदी निवड झाल्यास भाजपच्या पक्षवाढीला गती मिळणार आहे. तसेच चंदगड मागासलेला असल्याचे अजूनही बोलले जाते. मतदारसंघाला शिवाजी पाटील यांच्या रुपाने  आमदारपद मिळाल्यास तालुक्याचा म्हणजेच मतदारसंघाचा दुप्पटीने विकास होणार असून चंदगड तालुक्याचा मागासलेपणाचा शिक्का पुसण्यास मदत होणार आहे. असा दुहेरी लाभ चंदगडरांना या आमदारकीमुळे मिळणार आहे.

No comments:

Post a Comment